कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटचा प्रत्येक वयोगटातील नागरिकांना संसर्ग; 'या' वयोगटात आढळतायत सर्वाधिक रुग्ण!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 05:22 PM2021-06-20T17:22:40+5:302021-06-20T17:23:24+5:30

कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटचा प्रत्येक वयोगटातील नागरिकांना संसर्ग होत असल्याचं दिसून आलं आहे.

Delta variant affected people of all ages in the country maximum number of cases came in the age group of 20 30 | कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटचा प्रत्येक वयोगटातील नागरिकांना संसर्ग; 'या' वयोगटात आढळतायत सर्वाधिक रुग्ण!

कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटचा प्रत्येक वयोगटातील नागरिकांना संसर्ग; 'या' वयोगटात आढळतायत सर्वाधिक रुग्ण!

Next

कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटचा प्रत्येक वयोगटातील नागरिकांना संसर्ग होत असल्याचं दिसून आलं आहे. लहान मुलांपासून ते ८० वर्षांच्या वृद्ध व्यक्तींमध्येही डेल्टा व्हेरिअंट आढळून आला आहे. यात महिला आणि पुरूष रुग्ण यांचं प्रमाणही समसमान असल्याचं दिसून येत आहे. यात पुरूषांमध्ये डेल्टा व्हेअरिअंट आढळून येण्याचं प्रमाण किंचित जास्त आहे. पण डेल्टा व्हेरिअंटचा संसर्ग २० ते ३० वयोगटातील म्हणजेच तरुण पीढीत अधिक असल्याचं दिसून येत आहे. 

लहान मुलं आणि ३० ते ३९ वयोगटातील नागरिकांमध्येही डेल्टा व्हेरिअंट आढळून येण्याचं प्रमाण वाढताना दिसत आहे. भारतासह संपूर्ण जगभरात डेल्टा व्हेरिअंट आणि त्याच्या म्यूटेट व्हेरिअंटवर अभ्यास करणाऱ्या इंग्लंडच्या पब्लिक हेल्थ संस्थेनुसार डेल्टा व्हेरिअंट प्रत्येक वयोगटात आढळून येत आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंट सर्वात आधी महाराष्ट्रात आढळल्याचं सांगितलं जात आहे. याला सुरुवातील डबल म्यूटेट व्हेरिअंट म्हणून संबोधण्यात आलं होतं. डेल्टा व्हेरिअंटमुळेच देशात कोरोनाची दुसरी लाट आली आणि रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. 

डेल्टा व्हेरिअंटचा सामना करत असतानाच आता डेल्ट प्लस व्हेरिअंटनं धडक दिली आहे. त्यामुळे आगामी काळात मोठं संकट उभं राहू शकतं असा अंदाज व्यक्त केला जात आहे. डेल्टा प्लेस व्हेरिअंट सध्या भारतासह कमीतकमी १० देशांमध्ये आढळून आला आहे. यात देशात डेल्टा प्लेसचे एकूण ८ रुग्ण आढळले आहेत. 

Web Title: Delta variant affected people of all ages in the country maximum number of cases came in the age group of 20 30

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.