Delhi Violence: दिल्ली दंगलीतील सीसीटीव्ही सुरक्षित ठेवण्यासाठी याचिका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 04:26 AM2020-03-17T04:26:27+5:302020-03-17T04:26:44+5:30

मुख्य न्यायाधीश डी. एन. पटेल आणि न्या. सी. हरिशंकर यांच्या पीठाने अधिकाऱ्यांना सोमवारी ही नोटीस जारी केली.

Delhi Violence: Petition to secure CCTV in Delhi riots | Delhi Violence: दिल्ली दंगलीतील सीसीटीव्ही सुरक्षित ठेवण्यासाठी याचिका

Delhi Violence: दिल्ली दंगलीतील सीसीटीव्ही सुरक्षित ठेवण्यासाठी याचिका

Next

नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीत अलीकडेच झालेल्या दंगलीचे सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवण्यासाठी पोलिसांना निर्देश देण्याबाबतची याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. या याचिकेवरून दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकार, पोलीस आणि आप सरकार यांना उत्तर मागितले आहे. मुख्य न्यायाधीश डी. एन. पटेल आणि न्या. सी. हरिशंकर यांच्या पीठाने अधिकाऱ्यांना सोमवारी ही नोटीस जारी केली. याप्रकरणी पुढील सुनावणी २७ मार्च रोजी होणार आहे. ही याचिका जमीयत उलेमा-ए-हिंदने दाखल केली आहे. या याचिकेत अशी विनंती करण्यात आली आहे की, दंगलग्रस्त भागातील २३ फेब्रुवारी ते १ मार्च या काळातील सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवण्यात यावेत.

Web Title: Delhi Violence: Petition to secure CCTV in Delhi riots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.