फळविक्री करणारा बनला जैश-ए-मोहम्मद संघटनेचा दहशतवादी; पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 12:00 PM2019-07-17T12:00:31+5:302019-07-17T12:01:59+5:30

बशीरने 1992 रोजी बीएसएफच्या जवानांसमोर शरणागती पत्करली होती. 2002 मध्ये तो जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेत सामील झाला.

Delhi Police special cell on Tuesday arrested a wanted Jaish-e-Mohammed terrorist in Srinagar. | फळविक्री करणारा बनला जैश-ए-मोहम्मद संघटनेचा दहशतवादी; पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

फळविक्री करणारा बनला जैश-ए-मोहम्मद संघटनेचा दहशतवादी; पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

Next

नवी दिल्ली - पाच वर्षापासून फरार असलेला जैश-ए-मोहम्मदचादहशतवादी बशीर अहमद पुनूरला विशेष टीमने श्रीनगरमधून अटक केला आहे. दिल्ली पोलिसांनी बशीरची माहिती देणाऱ्याला 2 लाखाचं बक्षिस ठेवलं होतं. 2013 मध्ये बशीर अहमद फरार झाला होता. सोमवारी पोलिसांच्या विशेष टीमने त्याला श्रीनगरच्या कोठीबाग परिसरातून अटक केली. विशेष टीमने बशीरचे दोन साथीदार फैयाज अहमद लोन आणि अब्दुल मजीद बाबा यांनी यावर्षीच्या मार्च आणि मे महिन्यात अटक केलं होतं. तेव्हापासून बशीर पोलिसांच्या तावडीत येऊ नये यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य करत होता. 

विशेष टीमचे डीसीपी संजीव कुमार यांनी सांगितले की, बशीरला 2007 मध्ये दिल्ली पोलिसांसोबतच्या चकमकीत अटक झाली होती. मात्र न्यायालयातील सुनावणीवेळी त्याला जामीन मिळाला होता. त्यानंतर हायकोर्टाने बशीरला शिक्षा सुनावली. जामीन मिळाल्यानंतर बशीर कोर्टाच्या सुनावणीला गैरहजर राहिला. त्याच्याविरोधात अटकेचे आदेश देण्यात आले. बशीरची माहिती देणाऱ्याला पोलिसांनी 2 लाखाचं बक्षिस ठेवलं होतं. बशीरच्या अटकेसाठी विशेष पोलिसांची टीमही काश्मीरच्या डेरा येथे दाखल झाली होती. 25 मार्च रोजी बशीरचा साथीदार फैयाजला श्रीनगरमधून अटक केली तर दुसरा साथीदार अब्दुल मजीदला 11 मे रोजी अटक करण्यात आली. 

बशीरने 1992 रोजी बीएसएफच्या जवानांसमोर शरणागती पत्करली होती. 2002 मध्ये तो जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेत सामील झाला. दहशतवादी कृत्यांमध्ये बशीरने महत्वाची भूमिका निभावली होती. तसेच हवालाच्या माध्यमातून पैशाची अफरातफर करणे यामध्ये बशीर माहीर होता. बशीरचा जन्म जम्मू काश्मीरच्या सोपेरमध्ये झाला आहे. 2007 मध्ये त्याला अटक होण्याआधी तो फळ विक्रीचं काम करत होता. 1990 मध्ये काश्मीर घाटीमध्ये बशीरने वास्तव्य केलं. त्यावेळी तो हिज्बुल मुजाहिद्दीन दहशतवादी संघटनेत होता. पाकव्याप्त काश्मीरात प्रशिक्षण घेतल्यानंतर बशीरला हत्यारं आणि दारुगोळा मिळू लागला. 

दिल्लीत मोठ्या षडयंत्रामागे बशीरचा हात होता. 7 ऑगस्ट 2013 मध्ये दिल्लीच्या कोर्टाने शाहीद गफूरला शिक्षा सुनावली आणि बशीर फैयाज आणि अब्दुल मजीदला निर्दोष केलं होतं. त्यानंतर पोलिसांनी दिल्लीच्या हायकोर्टात याचिका दाखल केली. त्यामध्ये बशीरला हायकोर्टाने शिक्षा सुनावली. या शिक्षेच्या सुनावणीनंतर बशीर आणि त्याचे दोन साथीदार फरार होते. अखेर त्यांना काश्मीरमधून अटक करण्यात आली. 
 

Web Title: Delhi Police special cell on Tuesday arrested a wanted Jaish-e-Mohammed terrorist in Srinagar.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.