Delhi Election Result 2020: 'हम होंगे कामयाब...', निकाल लागण्याआधीच अलका लांबा यांचं ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 09:16 AM2020-02-11T09:16:49+5:302020-02-11T09:27:52+5:30

दिल्ली विधानसभा निवडणुकीत गड कोण राखणार याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.

Delhi Election Result 2020: alka lamba tweet we will win before delhi assembly election result chandni chowk aap congress bjp | Delhi Election Result 2020: 'हम होंगे कामयाब...', निकाल लागण्याआधीच अलका लांबा यांचं ट्विट

Delhi Election Result 2020: 'हम होंगे कामयाब...', निकाल लागण्याआधीच अलका लांबा यांचं ट्विट

Next
ठळक मुद्देदिल्ली विधानसभेत एकूण 70 जागादिल्ली विधानसभा निवडणुकीत गड कोण राखणार याकडे सर्वांच लक्षआम आदमी पार्टीविरुद्ध भाजपा आणि काँग्रेस असा तिरंगा सामना

नवी दिल्ली : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. दिल्लीमध्ये सत्ताधारी आम आदमी पार्टीविरुद्ध भाजपा आणि काँग्रेस असा तिरंगा सामना आहे. त्यामुळे आता दिल्ली विधानसभा निवडणुकीत गड कोण राखणार याकडे सर्वांच लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.  

चांदनी चौक विधानसभा मतदार संघातील काँग्रेसच्या उमेदवार अलका लांबा यांनी निवडणुकीच्या निकालापूर्वी ट्विट केले आहे. आम्ही जिंकत नाही आहोत तर हारत सुद्धा नाही आहोत, असे ट्विट अलका लांबा यांनी आपल्या मुलांसोबत केलेल्या चर्चेवरून केले आहे. त्या ट्विटवर लिहिले आहे की,  ''हृतिक (माझ्या मुलगा) : आई चिंता करू नकोस, आम्ही जिंकत नाही आहोत तर हारत सुद्धा नाही आहोत." याशिवाय दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, "हम होंगे कामयाब...".

दरम्यान, आठ फेब्रुवारी रोजी मतदान केंद्राबाहेर अलका लांबा आणि आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यामध्ये वादावादी झाली होती. त्यावेळी आपच्या एका कथित कार्यकर्त्याने अलका लांबा यांच्याबाबत आक्षेपार्ह शेरेबाजी केली होती. त्यामुळे संतापलेल्या अलका लांबा यांनी या कार्यकर्त्यावर हात उगारला. या प्रकारामुळे पररिसरात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर पोलिसांनी संबंधित कार्यकर्त्याला ताब्यात घेतले होते. 

अलका लांबा यांच्याविरोधात चांदणी चौक विधानसभा मतदार संघातून आम आदमी पार्टीचे उमेदवार प्रल्हाद सिंह साहनी आणि भाजपाचे उमेदवार सुमन कुमार गुप्ता निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान, आज दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. यासाठी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दिल्लीकरांनी नेमकी कोणत्या पक्षाला साथ दिली हे आज या निकालाच्या माध्यमातून समजणार आहे. 

दिल्ली विधानसभेत एकूण 70 जागा आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने तब्बल 67 जागा जिंकल्या होत्या. तर भाजपाला केवळ तीन जागा जिंकण्यात यश मिळाले होते. दिल्लीतली आपची सत्ता कायम राहील, असा अंदाज सर्वच एक्झिट पोल्सनी वर्तविला आहे. मात्र, गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपाच्या जागा वाढण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

Delhi Election Results Live: भाजपापेक्षा 'आप' तिपटीने पुढे; काँग्रेसचा 'चंचूप्रवेश'

Delhi Election Result 2020: निकालापूर्वीच भाजपानं स्वीकारला पराभव?, कार्यालयात लागले पोस्टर

IND vs NZ 3rd ODI Live Score: भारताला तिसरा धक्का; पृथ्वी शॉ माघारी

‘मी येते गं आई’ म्हणून घराबाहेर पडलेली ‘ती’ परतलीच नाही...

Web Title: Delhi Election Result 2020: alka lamba tweet we will win before delhi assembly election result chandni chowk aap congress bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.