Delhi Exit Poll 2020 : दिल्लीत फिर एक बार केजरीवाल सरकार, 'आप'ला 'एवढ्या' जागा मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2020 06:41 PM2020-02-08T18:41:49+5:302020-02-08T19:43:45+5:30

दिल्ली विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडलं असून, आता जनतेचा कौल हाती आला आहे.

Delhi Election 2020 : Once again in Delhi, the Kejriwal government, AAP will win 63 seats | Delhi Exit Poll 2020 : दिल्लीत फिर एक बार केजरीवाल सरकार, 'आप'ला 'एवढ्या' जागा मिळणार

Delhi Exit Poll 2020 : दिल्लीत फिर एक बार केजरीवाल सरकार, 'आप'ला 'एवढ्या' जागा मिळणार

Next

नवी दिल्लीः दिल्ली विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडलं असून, आता एक्झिट पोल हाती आला आहे. दिल्लीत पुन्हा एकदा केजरीवाल सरकार सत्तेत येणार असल्याचे स्पष्ट संकेत एबीपी न्यूज आणि सी व्होटरच्या एक्झिट पोलमधून मिळाले आहेत. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांपैकी आम आदमी पार्टीला 49-63 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर भाजपाला दिल्लीत 5 ते 19 जागा मिळण्याची शक्यता आहे. तसेच गेल्या वेळी भोपळाही फोडता न आलेल्या काँग्रेसला यंदा 4 जागा मिळणार असल्याचं सूतोवाच करण्यात आलं आहे. 

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, तसेच गोपाल राय व आतिशी (सर्व आप), भाजपाचे आशीष सूद, तेजिंदरपाल बग्गा, विजेंदर गुप्ता आणि अरविंदरसिंह लवली, कृष्णा तीरथ, अलका लांबा हे महत्त्वाचे नेते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ही निवडणूक आम आदमी पक्षासाठी अटीतटीची, भारतीय जनता पक्षासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नेतृत्व कसोटी पाहणारी, तर काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई आहे. निवडणूक प्रचारात स्थानिक ते राष्ट्रीय मुद्दे प्रचारात गाजले होते. अनेक आयाराम-गयारामही यंदा रिंगणात उतरले आहे. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल काय लागतो हे 11 फेब्रुवारीला मतमोजणीनंतरच समजणार आहे.

देशभरात नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून निषेध मोर्चे आणि आंदोलनं काढली जात आहेत. त्यातच शाहीन बागमधल्या आंदोलनात एका तरुणानं गोळीबार केल्यानं हे प्रकरण चांगलेच तापले होते. भाजपानंही या मुद्द्यावर आम आदमी पार्टीला घेरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. त्यामुळे दिल्ली विधानसभेत शाहीन बागचा मुद्दा गाजतोय. पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत आपनं 70 पैकी 67 जागांवर विजय मिळवला होता. भाजपला तीन जागांवर यश मिळाले तर काँग्रेसला खातंही उघडता आले नव्हते. 

Web Title: Delhi Election 2020 : Once again in Delhi, the Kejriwal government, AAP will win 63 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.