केजरीवाल यांच्या मुलीला ३४ हजारांना फसवलं; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2021 06:01 AM2021-02-09T06:01:06+5:302021-02-09T06:05:43+5:30

हर्षिताने ई- कॉमर्सच्या माध्यमातून सोफा विक्रीसाठी माहिती दिली होती. या व्यक्तीने स्वत: खरेदीदार बनून ही फसवणूक केली.

Delhi CM Arvind Kejriwals daughter duped of Rs 34000 by online scammer | केजरीवाल यांच्या मुलीला ३४ हजारांना फसवलं; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

केजरीवाल यांच्या मुलीला ३४ हजारांना फसवलं; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

Next

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मुलगी हर्षिता हिची एका व्यक्तीने ३४ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. हर्षिताने ई- कॉमर्सच्या माध्यमातून सोफा विक्रीसाठी माहिती दिली होती. या व्यक्तीने स्वत: खरेदीदार बनून ही फसवणूक केली.

पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षिता हिने सोफा विक्रीसाठी ई- कॉमर्सच्या माध्यमातून माहिती दिली होती. या व्यक्तीने सोफा खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली आणि संपर्क केला. 

त्याने हर्षिताच्या खात्यात छोटी रक्कमही टाकली. त्यानंतर या व्यक्तीने एक क्यूआर कोड पाठविला आणि तो स्कॅन करण्यास सांगितले. जेणेकरून ठरविलेली रक्कम त्यांच्या खात्यात टाकता येईल. पण, असे केल्याने हर्षिताच्या खात्यातून २० हजार रुपये वजा झाले. त्यानंतर हर्षिताने या व्यक्तीची तक्रार केल्यावर त्याने सांगितले की, हे चुकीने झाले आहे. पुन्हा अशी प्रक्रिया केल्यावर हर्षिताच्या खात्यातून १४ हजार रुपये वजा झाले. 

Web Title: Delhi CM Arvind Kejriwals daughter duped of Rs 34000 by online scammer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.