लॉकडाऊन वाढविण्याची कोणतीही योजना नाही, केजरीवालांचे स्पष्टीकरण 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 03:31 PM2020-06-15T15:31:01+5:302020-06-15T15:38:34+5:30

याआधी 18 जूनपासून देशभरात लॉकडाऊन करण्यात येईल, असा दावा केला जात होता. यावर रविवारी पीआयबीकडून स्पष्टीकरण देण्यात आले.

delhi cm arvind kejriwal says no plan to impose lockdown | लॉकडाऊन वाढविण्याची कोणतीही योजना नाही, केजरीवालांचे स्पष्टीकरण 

लॉकडाऊन वाढविण्याची कोणतीही योजना नाही, केजरीवालांचे स्पष्टीकरण 

Next
ठळक मुद्देदिल्लीत पुन्हा लॉकडाऊन वाढविण्यात येईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती.देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवर आळा घाल्यासाठी सरकार युद्ध पातळीवर काम करताना दिसत आहे.

नवी दिल्ली : दिल्लीत कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्र आणि राज्य सरकारवरील ताण वाढला आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. त्यामुळे दिल्लीत पुन्हा लॉकडाऊन वाढविण्यात येईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, याबाबतचे वृत्त दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी फेटाळून लावत दिल्लीत लॉकडाऊन वाढविण्याची कोणतीही योजना नाही, असे स्पष्ट केले आहे. अरविंद केजरीवाल यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. 

याआधी 18 जूनपासून देशभरात लॉकडाऊन करण्यात येईल, असा दावा केला जात होता. यावर रविवारी पीआयबीकडून स्पष्टीकरण देण्यात आले. पीआयबीने ट्विटमध्ये म्हटले की, "ही चुकीची बातमी आहे. अशा कोणत्याही योजनेचा विचार केला जात नाही. अफवांपासून सावध राहा."

दुसरीकडे, दिल्लीत कोरोनाचा सामना करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलविली होती. या बैठकीत भाजपा, आम आदमी पार्टी, काँग्रेस आणि दिल्लीचे बसपाचे अध्यक्ष यांचा समावेश असल्याचे समजते. दरम्यान, अमित शहा यांनी काल अरविंद केजरीवाल यांच्यासमवेत दिल्लीतील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैठक घेतली. यानंतर अमित शहा यांनी सायंकाळी पाच वाजता महापौर आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत कोरोनाबद्दल चर्चा केली. या बैठकीला लेफ्टनंट गव्हर्नर अनिल बैजल, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन हेदेखील उपस्थित होते. बैठकीत दिल्लीतील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.

दिल्लीत कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. रविवारी जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार, गेल्या 24 तासांत दिल्लीमध्ये 2224 नवीन रुग्ण आढळले आहेत आणि 56 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत दिल्ली कोरोनाची रुग्णांची संख्या 41182 वर पोहचली आहेत, तर आतापर्यंत 1327 लोकांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत दिल्लीतील परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे सरकारसाठी आव्हान आहे. 

दरम्यान, देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवर आळा घाल्यासाठी सरकार युद्ध पातळीवर काम करताना दिसत आहे. देशात गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे 11 हजार 502 नवे रुग्ण आढळले. तर 325 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. चिंताजनक म्हणजे  भारतात कोरोना रुग्णांची संख्या 3 लाख 32 हजार 424 वर पोहोचली आहे. आतापर्यंत तब्बल 9 हजार 520 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आणखी बातम्या....

"अज्ञानापेक्षा धोकादायक गोष्ट म्हणजे अहंकार", राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

"हा साधा चावटपणा नाही, हा भलामोठा कट आहे", आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया

मुख्यमंत्र्यांच्या व्हिडीओत छेडछाड, दिग्विजय सिंह यांच्यासह १२ जणांविरोधात एफआयआर दाखल

CoronaVirus News : अमित शहा 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये, आज बोलविली सर्वपक्षीय बैठक       

पीएम केअर्स फंडाचे ऑडिट होणार, स्वतंत्र ऑडिटरची नियुक्ती

Web Title: delhi cm arvind kejriwal says no plan to impose lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.