अस्तित्वच्या हाती मोबाईल देताच डेटा होतोय गायब; चमत्कार बघायला घरी होतेय गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 07:54 AM2021-09-23T07:54:14+5:302021-09-23T07:58:16+5:30

अस्तित्व अग्रवालच्या घराबाहेर लोकांची रांग लागते. त्याच्या हाती मोबाईल देऊन अनेक जण त्याचा व्हिडिओ चित्रित करतात.

Data finish as soon as the mobile is handed to astitva; Crowds at home to see the miracle | अस्तित्वच्या हाती मोबाईल देताच डेटा होतोय गायब; चमत्कार बघायला घरी होतेय गर्दी

अस्तित्वच्या हाती मोबाईल देताच डेटा होतोय गायब; चमत्कार बघायला घरी होतेय गर्दी

googlenewsNext

अलीगढ : मोबाईलचे कोणतेही बटन दाबवल्याशिवाय, फोन फॅक्टरी रिसेट केल्याशिवाय त्यातला संपूर्ण डेटा जाणे शक्य आहे का? या प्रश्नाचे उत्तर नाही असे असले तरी येथील अस्तित्व अग्रवाल या मुलाच्या हातात मोबाईल गेल्यावर तो संपूर्णपणे रिसेट होतो, त्यातला सगळा डेटा जातो. फोनमधले मेसेज, फोटो, व्हिडिओ आणि सगळ्या फाईल्स डिलीट होतात. अनेकांना ही गोष्ट पचनी पडणार नाही. 

अस्तित्व अग्रवालच्या घराबाहेर लोकांची रांग लागते. त्याच्या हाती मोबाईल देऊन अनेक जण त्याचा व्हिडिओ चित्रित करतात. त्याच्याकडे मोबाईल दिल्यावर खरेच त्यातील सगळा डेटा डिलीट होतो का, अशी उत्सुकता अनेकांच्या मनात आहे. त्यामुळे अनेक जण थेट चमत्कार पाहायला त्याच्या घरी येतात.

अस्तित्वच्या हाती मोबाईल दिल्यावर तो रिसेट होत असल्यामुळे अनेकांना धक्का बसला. अस्तित्वचे वडील गौरव यांनी त्याची वैद्यकीय चाचणी करून घेतली. त्या अहवालात काहीच वावगे आढळले नाही. अस्तित्वच्या हातात मोबाईल देताच त्यातील संपूर्ण डेटा गायब होत असल्याचे १२ मे रोजी त्याच्या आई-वडिलांच्या सगळ्यात आधी लक्षात आले. 

१२ मे रोजी अस्तित्वने कुटुंबातील एकाचा मोबाईल घेतला होता. त्यातील डेटा अचानक गायब झाला. त्यामुळे आई - वडील त्याच्यावर रागावले. डेटा डीलिट झाल्याची तक्रार घेऊन कुटुंबीय मोबाईलच्या सर्व्हिस सेंटरमध्ये गेले. मात्र, तेथे मोबाईल व्यवस्थित होता. २२ ऑगस्ट रोजी देखील तशीच घटना घडली. त्यावेळी अस्तित्व त्याच्या आईसोबत ननिहालला गेला होता. रक्षाबंधनादिवशीच त्याच्या आईच्या फोनमधील डेटा गायब झाला.

अस्तित्वच्या जवळ मोबाईल नेल्यानंतर त्यातला डेटा डिलीट होत असल्याचे नंतर कुटुंबाच्या लक्षात आले. त्यांनी अस्तित्वची वैद्यकीय चाचणी घेतली. मात्र, अहवाल अगदी सामान्य होता. 

प्रकृतीची चिंता
डॉक्टरांनी इलेक्ट्रॉनिक बीपी मशीनच्या मदतीने रक्तदाब तपासण्याचा प्रयत्न केला; पण मशीन एरर दाखवू लागली. त्यामुळे रक्तदाब तपासता आला नाही. अस्तित्वला शरीरात कोणतेही बदल जाणवत नाहीत. अस्तित्वच्या कुटुंबाला आणि नातेवाइकांना त्याच्या प्रकृतीची चिंता सतावत आहे.
 

Web Title: Data finish as soon as the mobile is handed to astitva; Crowds at home to see the miracle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.