बापरे! 400 रुपयांत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा रिपोर्ट करून मिळतो निगेटिव्ह, धक्कादायक प्रकार उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2021 09:11 AM2021-01-01T09:11:38+5:302021-01-01T09:14:35+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना फक्त काही रुपयांमध्ये निगेटिव्ह रिपोर्ट करून देत असल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे.

covid 19 report negative positive 400 rupees pathkind labs dhanbad jharkhand | बापरे! 400 रुपयांत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा रिपोर्ट करून मिळतो निगेटिव्ह, धक्कादायक प्रकार उघड

बापरे! 400 रुपयांत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा रिपोर्ट करून मिळतो निगेटिव्ह, धक्कादायक प्रकार उघड

Next

नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने चिंतेत भर पडत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल एक कोटीचा टप्पा पार केला आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय केले जात आहेत. चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. मात्र याचवेळी कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना फक्त काही रुपयांमध्ये निगेटिव्ह रिपोर्ट करून देत असल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. कोरोना चाचणीच्या रिपोर्टमध्ये गडबड करणारं एक मोठं रॅकेट उघड झालं आहे. 

झारखंडच्या धनबादमध्ये कोरोना चाचणीच्या रिपोर्टबाबत हा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाची चाचणी पॉझिटिव्हआलेल्या रुग्णांना चक्क निगेटिव्ह असल्याचं प्रमाणपत्र दिलं जात आहे. अवघ्या 400 रुपयांत रिपोर्ट निगेटिव्ह करून दिला जात असे. पॅथकाईंड लॅब ही चाचण्यांसाठी नेमलेली एक एजन्सी आहे. ती आणि तिच्या शाखेच्या माध्यमातून हा धक्कादायक प्रकार सुरू होता. या पॅथकाईंड लॅबवर अयोग्य पद्धतीने रुग्णांची नोंद केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

कोरोना चाचणीच्या रिपोर्टमध्ये गडबड करणारं एक मोठं रॅकेट आलं समोर

प्रशासनाने या प्रकाराचा अधिक तपास केला असता पॅथकाईंड लॅबमध्ये काम करणारा विकास नावाचा कर्मचारी यामध्ये प्रामुख्याने सहभागी होता. विकास अवघ्या 400 रुपयांत कोरोना पॉझिटिव्ह नागरिकांना रिपोर्ट निगेटिव्ह बनवून देत असे. याबाबत तक्रार मिळाल्यावर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डीसी उमाशंकर सिंह यांनी वरिष्ठ अधिकारी श्याम नारायण राम यांच्या नेतृत्वात  5 सदस्यीय तपास समितीची नेमणूक केली. या तपास समितीने सगळ्या प्रकरणाची तपासणी करत डीसी सिंह यांना अहवाल दिला. या अहवालात सांगितलं गेलं, की पॅथकाईंड लॅबचा कर्मचारी विकास आणि अजून एक गौतम कुमार नावाची व्यक्ती हे रॅकेट चालवत होती. सिंह यांनी या दोघांविरूद्ध एफआयआर दाखल करत आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत कारवाईचे आदेश दिले आहेत.

डीसी सिंह यांनी पॅथकाईंड लॅबच्या वरिष्ठ विक्री अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस दिली आहे आणि 24 तासांमध्ये स्पष्टीकरण मागितलं आहे. पॅथकाईंड लॅबच्या सर्व शाखांची एनओसी रद्द करत सुरक्षा रक्कमही जप्त करण्याचे आदेश दिले देण्यात आले आहेत. तपास समितीने आपल्या अहवालात प्रत्येक सॅम्पलची नोंद आरटी-पीसीआर ऍपच्या माध्यमातून केली जाते. रुग्णाची सविस्तर माहिती यात भरली जाते. त्या रुग्णाचा एसआरएफ क्रमांक जनरेट झाल्यावर सीएमएस पोर्टलमध्ये अपडेट केल्या जातो. यानंतर पोर्टलच्या माध्यमातून रिझल्ट डाTनलोड केला जातो असं सांगितलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: covid 19 report negative positive 400 rupees pathkind labs dhanbad jharkhand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.