Coronavirus: मूळ गावी परतलेल्या मजुरांचा मुक्काम वडाच्या झाडावर; झोपड्या लहान असल्याने अनोखे ‘क्वारंटाईन’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 03:54 AM2020-03-29T03:54:19+5:302020-03-29T06:17:26+5:30

स्थलांतरित मजुरांनी ‘होम क्वारंटाईन’चे बंधन पाळण्यासाठी एका आठवड्यापासून गावाबाहेरच्या वडाच्या झाडावर मुक्काम करून सामाजिक जबाबदारीचा वस्तुपाठ घालून दिला आहे.

Coronavirus: Workers qurantine on the tree | Coronavirus: मूळ गावी परतलेल्या मजुरांचा मुक्काम वडाच्या झाडावर; झोपड्या लहान असल्याने अनोखे ‘क्वारंटाईन’

Coronavirus: मूळ गावी परतलेल्या मजुरांचा मुक्काम वडाच्या झाडावर; झोपड्या लहान असल्याने अनोखे ‘क्वारंटाईन’

Next

कोलकाता : सध्याचा देशव्यापी ‘लॉकडाऊन’ सुरू होण्याआधी केरळमधून बाहेर पडून प. बंगालच्या पुरुलिया या अत्यंत मागास जिल्ह्यातील मूळ गावी परत आलेल्या ७ स्थलांतरित मजुरांनी ‘होम क्वारंटाईन’चे बंधन पाळण्यासाठी एका आठवड्यापासून गावाबाहेरच्या वडाच्या झाडावर मुक्काम करून सामाजिक जबाबदारीचा वस्तुपाठ घालून दिला आहे.

परदेशातून परत आलेल्या अनेक शहरी व सुशिक्षित नागरिकांनी ‘सोशल डिन्स्टन्सिंग’ न पाळल्याने कुटुंबातील व परिसरातील अनेकांना कोरोनाची लागण झाल्याच्या घटना समोर आलेल्या असताना बंगालमधील या अशिक्षित मजुरांचे शहाणपण नक्कीच अनेकांच्या डोळ्यांत अंजन घालणारे आहे.

हे सातही मजूर गेल्या सोमवारी पुरुलिया जिल्ह्यातील बेहरामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भांगडीडीह या त्यांच्या मूळ गावी परत आले. तेव्हापासून त्यांनी गावाबाहेरच्या एका विस्तीर्ण वडाच्या झाडावर मुक्काम ठोकला आहे. त्यासाठी त्यांनी लाकडी खाटा (चारपायी) झाडाच्या फांद्यांना घट्ट बांधल्या आहेत.

घरचे लोक त्यांचे जेवण घेऊन येतात व ते झाडाखाली ठेवून दूर जाऊन बसतात. हे सातही जण झाडावरून खाली उतरतात, जेवतात व बाजूने बाहणाऱ्या ओढ्यावर साबणाने भांडी स्वच्छ घासतात व ती आणून पुन्हा झाडाखाली ठेवतात. घरून येणाºया किंवा गावातून येणाºया अन्य कोणाचाही या सात जणांशी अजिबात संपर्क येणार नाही, याची कटाक्षाने काळजी घेतली जाते.

या सात जणांपैकी एक बिजय सिंह याने सांगितले, की गेल्या शनिवारी आम्ही चेन्नई येथे रेल्वेत बसलो व रविवारी खडगपूरला पोहोचलो. रेल्वे स्थानकात डॉक्टरांनी आमची सर्वांची तपासणी केली. कोणालीही कोरानाची लक्षणे दिसली नाहीत; पण तरीही डॉक्टरांनी १४ दिवस घरीच पूर्णपणे वेगळे (होम क्वारंटाईन) राहण्यास सांगितले. गावातील आमच्या सर्वांच्या झोपड्या खूपच लहान आहेत.

डॉक्टरांचा सल्ला आम्हाला मनापासून पटला; पण घरातच इतरांपासून वेगळे कसे राहायचे, असा आम्हाला प्रश्न पडला. खडगपूरहून गावी परत येत असताना खूप विचार केला आणि ही शक्कल सुचली. गावकऱ्यांनी चारपायी, अंथरुण-पांघरूण, दोºया, मच्छरदाण्या वगैरे सामान आम्हाला आणून दिले आणि आम्ही वडाच्या झाडावर बिºहाड थाटले.

या मजुरांच्या आणि गावकºयांच्या समजूतदारपणाचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे, असे सांगून त्या भागाचे ‘बीडीओ’ ध्रुवपद शांडिल्य म्हणाले की, प्रशासन या गावाला कशा प्रकारे बक्षिस देता येईल, यावर विचार करत आहे.

सुगीचा हंगाम व श्वापदे

अयोध्या डोंगररांगेच्या पायथ्याशी असलेल्या या गावात सध्या सुगीचा हंगाम चालू आहे. गावात सर्वांच्या घराबाहेरच्या खळ्यांमध्ये कापणी केलेले पीक आणून टाकलेले आहे. त्यामुळे जंगलातून येणारे बिबटे, हत्ती, रानडुकरे व कोल्हे अशा श्वापदांचा गावात सध्या सुळसुळाट आहे. त्यामुळे गावाबाहेर उघड्या जमिनीवर राहणे धोक्याचे असल्याने या मजुरांनी उंच झाडावर राहण्याचे ठरविले. तरीही, चार-पाच गावकरी हातात धनुष्यबाण घेऊन आळीपाळीने रात्री झाडाखाली पहारा देत असतात.

Web Title: Coronavirus: Workers qurantine on the tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.