CoronaVirus: तुमचे प्रयत्न अपुरे, आम्ही समाधानी नाही; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 02:53 PM2021-05-24T14:53:47+5:302021-05-24T15:00:26+5:30

CoronaVirus: स्थलांतरीत मजुरांच्या मुद्यावर दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.

coronavirus supreme court slams centre govt over migrant labourers issue | CoronaVirus: तुमचे प्रयत्न अपुरे, आम्ही समाधानी नाही; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला सुनावले

CoronaVirus: तुमचे प्रयत्न अपुरे, आम्ही समाधानी नाही; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला सुनावले

googlenewsNext
ठळक मुद्देसुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला फटकारलेस्थलांतरित मजुरांच्या नोंदणी प्रक्रियेवरून तीव्र नाराजीतुमचे प्रयत्न अपुरे, आम्ही समाधानी नाही, कोर्टाची खंत

नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशाला मोठा तडाखा दिला. हळूहळू कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. नव्या कोरोनाबाधितांची संख्या घटत असली, तरी मृत्यूचे वाढते प्रमाण चिंतेत भर घालत आहे. सर्वोच्च न्यायालयासह देशातील विविध उच्च न्यायालयांमध्ये कोरोनासंदर्भात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. स्थलांतरीत मजुरांच्या मुद्यावर दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी तुम्ही करत असलेले प्रयत्न अपुरे असून, आम्ही याबाबत समाधानी नाही, असे न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावले. (coronavirus supreme court slams centre govt over migrant labourers issue) 

स्थलांतरित मजुरांच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले असून, कामगार नोंदणी योजनेविषयी उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. मजूर, कामगारांची नोंदणी प्रक्रिया अतिशय संथगतीने सुरू असल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त केली. तसेच ही प्रक्रिया गतिमान करायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली. 

केंद्राशीच थेट करार, राज्यांना ‘मॉडर्ना’ लस मिळणार नाही; पंजाबचा प्रस्ताव फेटाळला

योजनांचा लाभ मिळत नाही

कामगार, मजुरांची नोंदणी प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. ती गतिमान होणे आवश्यक आहे. जेणेकरून स्थलांतरीत मजूर, कामगारांना सरकारी योजनांचा योग्य पद्धतीने आणि प्रमाणात लाभ मिळवता येऊ शकेल. मात्र, नोंदणी झाल्याशिवाय योजनांचा लाभ मिळू शकणार नाही. स्थलांतरीत मजूर, कामगारांना सरकारी योजनांचा लाभ कशा प्रकारे मिळेल, याबाबत केंद्र सरकारने निश्चित धोरण राबवले पाहिजे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. 

शेतकऱ्यांचे देशव्यापी आंदोलन! १२ विरोधी पक्षांचे समर्थन; उद्धव ठाकरे, ममता दीदींचा पाठिंबा

तुमच्या कामगिरीवर समाधानी नाही

असंघटित क्षेत्रातील मजूर, कामगारांच्या नोंदणी प्रक्रियेवरून केंद्र तसेच राज्यांचे सुरू असलेले प्रयत्न पुरेसे नाहीत. तुमच्या या कामगिरीवर आम्ही समाधानी नाही, या शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने सरकारला सुनावले आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या वारसांना ४ लाख रुपयांचे अनुदान देण्याबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर केंद्र सरकारला नोटीस बजावत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. 

गंभीर परिस्थितीत AIIMS च्या दिशाभूल करणाऱ्या गाइडलाइन्स; लष्करी सेवेतील डॉक्टरांनी झापलं

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत २ लाख २२ हजार ३१५ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. याच कालावधी देशात ३ लाख २ हजार ५४४ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले. गेल्या २४ तासांत देशभरात एकूण ४ हजार ४५४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या आढळून आलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशात रविवारी सर्वाधिक रुग्ण तामिळनाडूमध्ये आढळून आले. 
 

Web Title: coronavirus supreme court slams centre govt over migrant labourers issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.