CoronaVirus: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलं संक्रमित झाले तर काय करणार? SC नं सरकारला विचारला इमरजन्सी प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 02:09 PM2021-05-06T14:09:01+5:302021-05-06T14:10:38+5:30

सुनावणीदरम्यान जस्टिस चंद्रचूड म्हणाले, जर उद्या परिस्थिती बिघडलीच आणि कोरोना रुग्ण वाढले तर, तर आपण काय कराल. रिपोर्ट्समध्ये म्हणण्यात आले आहे, की तिसऱ्या लाटेत मुलांवरही परिणाम होऊ शकतो.

CoronaVirus: supreme court corona hearing concern over third wave of covid-19 | CoronaVirus: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलं संक्रमित झाले तर काय करणार? SC नं सरकारला विचारला इमरजन्सी प्लॅन

CoronaVirus: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलं संक्रमित झाले तर काय करणार? SC नं सरकारला विचारला इमरजन्सी प्लॅन

Next

नवी दिल्ली - संपूर्ण देशातच कोरोनाने हाहाकार माजवला आहे. देशाच्या राजधानीलाही कोरोनाचा मोठा फटका बसत आहे. याच पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात राजधानी दिल्लीतील ऑक्सिजन संकट आणि कोरोना स्थितीवर सुनावणी झाली. यावेळी, सर्वोच्च न्यायालयाने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भातही चिंता व्यक्त केली असून त्यासाठी आतापासूनच तयारी करण्यावर भर दिला आहे. (CoronaVirus: supreme court corona hearing concern over third wave of covid-19)

सुनावणीदरम्यान जस्टिस चंद्रचूड म्हणाले, जर उद्या परिस्थिती बिघडलीच आणि कोरोना रुग्ण वाढले तर, तर आपण काय कराल. रिपोर्ट्समध्ये म्हणण्यात आले आहे, की तिसऱ्या लाटेत मुलांवरही परिणाम होऊ शकतो.

सावधान...! कोरोनाची तिसरी लाटही येणार, तिला कुणीही रोखू शकत नाही...; सरकारचा इशारा

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे, तिसऱ्या लाटेत काय करायला हवे, याची तयारी आताच करावी लागेल. तरुणांचे लसीकरण करावे लागेल. जर मुलांवर त्याचा परिणाम झाला, तर कसे सांभाळाल, कारण मुलं तर स्वतः रुग्णालयात जाऊ शकत नाही. 

डॉक्टरांसंदर्भातही तयारी करावी लागेल -
सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे, की आज जवळपास दीड लाख डॉक्टर परीक्षेच्या तयारीत आहेत. जवळपास अडीच लाख नर्से घरात आहेत. हेच लोक तिसऱ्या लाटेत आपले इंफ्रास्ट्रक्चर बळकट करतील. एवढेच नाही, तर सर्वोच्च न्यायालयाने टिप्पणी करत म्हटले आहे, की आरोग्य कर्मचारी मार्च 2020 पासून सातत्याने काम करत आहेत. अशा स्थितीत त्यांच्यावरही ताण आहे.

CoronaVirus: चिंताजनक! भारतात मे नंतर आणखी हाहाकार माजवणार कोरोना, वैज्ञानिकांचा दावा!

सध्या देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला आहे. सातत्याने कोरोना रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. याच बरोबर, रुग्णालयांत बेड्स, ऑक्सिजनचीही कमतरता भासत आहे. याच बरोबर, आता न्यायालयाने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात टिप्पणी केली आहे.

कोरोनाची तिसरी लाटही येणार, तिला कुणीही रोखू शकत नाही -
देशात कोरोनाची तिसरी लाटही येणार, तिला कुणीही रोखू शकत नाही. मात्र, केव्हा येणार? कसा इफेक्ट करेल? हे सांगणे सध्या अवघड आहे. मात्र, यासाठी आपल्याला तयार रहावे लागले, असे केंद्र सरकारचे वैज्ञानिक सल्लागार विजय राघवन यांनी म्हटले आहे.

Covid-19 second wave: हार्ट अ‍ॅटॅकमुळे का होतोय कोरोना बाधितांचा मृत्यू? जाणून घ्या, लक्षणं आणि उपचार

Web Title: CoronaVirus: supreme court corona hearing concern over third wave of covid-19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.