coronavirus: संतापजनक! कोरोना होईल म्हणून मुलाने वृद्ध आईला घरात प्रवेश नाकारला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 12:42 PM2020-05-31T12:42:29+5:302020-05-31T12:42:49+5:30

कोरोनाच्या भीतीमुळे सर्वसामान्य लोक, शेजारीपाजारी, नातेवाईक आणि अगदी कुटुंबातील लोकही आपल्या जवळच्या लोकांकडे संशयाने पाहू लागले आहेत.

coronavirus: The son refused to let the mother into the house in fear of Corona BKP | coronavirus: संतापजनक! कोरोना होईल म्हणून मुलाने वृद्ध आईला घरात प्रवेश नाकारला

coronavirus: संतापजनक! कोरोना होईल म्हणून मुलाने वृद्ध आईला घरात प्रवेश नाकारला

Next

हैदराबाद - कोरोना विषाणूच्या वेगाने होत असलेला संसर्ग आणि त्यामुळे होत असलेल्या मृत्यूंमुळे सर्वसामान्यांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोनाच्या भीतीमुळे सर्वसामान्य लोक, शेजारीपाजारी, नातेवाईक आणि अगदी कुटुंबातील लोकही आपल्या जवळच्या लोकांकडे संशयाने पाहू लागले आहेत. त्यामुळेच दूरच्या शहरातून येणाऱ्या नातेवाईकांच्या जवळ जाण्यास किंवा त्यांना घरात घेण्यासही लोक घाबरत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपल्याला कोरोना होईल या भीतीने एका मुलाने दुसऱ्या शहरातून आलेल्या आपल्या ८० वर्षीय आईला घरात घेण्यास नकार दिला.

हा प्रकार तेलंगणामधील करीमनगर शहरात घडला आहे. येथील एक ८० वर्षीय वृद्ध महिला लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील सोलापूर येथे अडकली होती. दरम्यान, लॉकाडाऊनमधून सवलत देण्यात आल्यानंतर सदर महिला तेलंगणामधील आपल्या घरी परतली. मात्र सदर महिलेला कोरोना असू शकतो, असा संशय तिचा मुलगा आणि सुनेला असल्याने त्यांनी या वृद्ध महिलेला घरात प्रवेश नाकारला. सदर महिलेने आपण पूर्णपणे ठणठणीत असून, आपल्याला कुठलाही आजार नसल्याचे सांगण्याचा वारंवार प्रयत्न केला. मात्र तरीही तिचा मुलगा ऐकला नाही.

दरम्यान, आई मुलामध्ये निर्माण झालेल्या गैरसमजामध्ये अखेरीस शेजाऱ्यांनी हस्तक्षेप केला. त्यानंतर मोठ्या मुलाने सदर महिलेला घरात प्रवेश दिला. दरम्यान, सदर महिलेची कोरोनाची चाचणी करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती देताना करिमनगर महानगरपालिकेचे विभागीय अध्यक्ष इडला अशोक यांनी सांगितले की, लॉकडाऊनमध्ये सवलत मिळाल्यानंतर सोलापूर येथे नातेवाईकांकडे अडकलेली एक महिला शुक्रवारी घरी परत आली होती. मात्र तिचा मोठा मुलगा आणि सुनेने तिला घरात प्रवेश नाकारला होता.

Web Title: coronavirus: The son refused to let the mother into the house in fear of Corona BKP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.