Coronavirus : महिलांसाठी अधिक घातक ठरतेय कोरोनाची दुसरी लाट, समोर आलं धक्कादायक कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 08:34 PM2021-05-10T20:34:23+5:302021-05-10T20:35:21+5:30

Coronavirus in India : कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेमध्ये महिलांना अधिक संसर्ग होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Coronavirus: The second wave of coronavirus, which is more dangerous for women, came up with a shocking reason | Coronavirus : महिलांसाठी अधिक घातक ठरतेय कोरोनाची दुसरी लाट, समोर आलं धक्कादायक कारण

Coronavirus : महिलांसाठी अधिक घातक ठरतेय कोरोनाची दुसरी लाट, समोर आलं धक्कादायक कारण

Next
ठळक मुद्देसंपूर्ण देशाचा विचार केल्यास कोरोनाच्या एकूण रुग्णांमध्ये महिलांचे प्रमाण  ३५.४ टक्के महाराष्ट्रात हे प्रमाण तब्बल ३८ टक्के एवढे आहेमहिलांना कोरोनाचा संसर्ग अधिक प्रमाणात झालेल्या संसर्गाचा अर्थ या विषाणूच्या स्वभावात झालेला बदल आहे

हैदराबाद - कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे सध्या देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. यामधील धक्कादायक बाब म्हणजे कोरोनाची ही दुसरी लाट पहिल्या लाटेच्या तुलनेत अधिक धोकादायक ठरत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेमध्ये महिलांना अधिक संसर्ग होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (The second wave of coronavirus, which is more dangerous for women)

 तेलंगाणाची राजधानी असलेल्या  हैदराबादमधील आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्या महिलांचे प्रमाण ३८.५ टक्क्यांवर पोहोचले आहे. हे प्रमाण गतवर्षी जुलै महिन्यात ३४ टक्के होते. दरम्यान, महाराष्ट्रात हे प्रमाण तब्बल ३८ टक्के एवढे आहे. तर बिहारमध्ये हे प्रमाण सर्वाधिक आहे. बिहारमध्ये ४२ टक्के महिला बाधित झाल्या आहेत. 

संपूर्ण देशाचा विचार केल्यास कोरोनाच्या एकूण रुग्णांमध्ये महिलांचे प्रमाण  ३५.४ टक्के आहे. तर पुरुषांचे प्रमाण ६४.६ टक्के आहे. तज्ज्ञांच्या मते महिलांना कोरोनाचा संसर्ग अधिक प्रमाणात झालेल्या संसर्गाचा अर्थ या विषाणूच्या स्वभावात झालेला बदल आहे. सर्वसामान्यपणे महिला कोरोनाबाबतच्या नियमावलीचे पालन करतात. तर काम किंवा अन्य कारणांमुळे पुरुष हे महिलांच्या तुलनेत अधिक घराबाहेर पडत असतात. त्यामुळे त्यांना संसर्गाचा धोका अधिक असतो. मात्र आता महिल आणि कमी वयाच्या लोकांनाही कोरोनाचा संसर्ग होत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग हा गेल्या महिनाभरात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वेगाने वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे अनेक राज्यांमध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली होती. अॉक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला होता. मात्र केंद्र सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न केल्यानंतर आता परिस्थिती काही प्रमाणात सुधरली आहे.

Web Title: Coronavirus: The second wave of coronavirus, which is more dangerous for women, came up with a shocking reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.