coronavirus: दिलासादायक! कोरोनाची दुसरी लाट वेगाने ओसरणार, एप्रिलअखेरीत तब्बल ४० टक्के लोकांमध्ये अँटिबॉडी विकसित होणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 09:43 AM2021-04-17T09:43:41+5:302021-04-17T09:46:55+5:30

coronavirus In India : पहिल्या लाटेपेक्षा अधिक तीव्रतेने आलेल्या कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेमुळे देशातील विविध राज्यांमध्ये आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. मात्र कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेबाबत एका संशोधनामधून मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. 

coronavirus: The second wave of corona will recede rapidly, with antibodies developing in up to 40 percent of people by the end of April | coronavirus: दिलासादायक! कोरोनाची दुसरी लाट वेगाने ओसरणार, एप्रिलअखेरीत तब्बल ४० टक्के लोकांमध्ये अँटिबॉडी विकसित होणार 

coronavirus: दिलासादायक! कोरोनाची दुसरी लाट वेगाने ओसरणार, एप्रिलअखेरीत तब्बल ४० टक्के लोकांमध्ये अँटिबॉडी विकसित होणार 

googlenewsNext
ठळक मुद्देक्रेडिट सुसेच्या एका संशोधनानुसार कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लोक ज्या गतीने बाधित होत आहेत. तितक्याच वेगाने ही लाट ओसरू शकतेएप्रिलच्या अखेरीपर्यंत देशातील ४० टक्के लोकसंख्येमध्ये अँटिबॉडी विकसित होतीलभारतात कोरोनाची दुसरी लाट वेळीच थोपवली गेली नाही तर जून २०२१ च्या पहिल्या आठवड्यापर्यंत देशात दररोज १ हजार ७५० ते २ हजार ३२० मृत्यू होतील

नवी दिल्ली - सध्या संपूर्ण देश कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेशी झुंजत आहे.(coronavirus In India) पहिल्या लाटेपेक्षा अधिक तीव्रतेने आलेल्या कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेमुळे देशातील विविध राज्यांमध्ये आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. (CoronaVirus Positive News) मात्र कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेबाबत एका संशोधनामधून मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. (The second wave of coronavirus will recede rapidly, with antibodies developing in up to 40 percent of people by the end of April)

क्रेडिट सुसेच्या एका संशोधनानुसार कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लोक ज्या गतीने बाधित होत आहेत. तितक्याच वेगाने ही लाट ओसरू शकते, असे या संशोधनामध्ये म्हटले आहे. तसेच एप्रिलच्या अखेरीपर्यंत देशातील ४० टक्के लोकसंख्येमध्ये अँटिबॉडी विकसित होतील, असा अंदाज या संशोधनामधून वर्तवण्यात आला आहे. 

या संशोधनामध्ये म्हटले आहे की, गेल्यावर्षी डिसेंबरच्या अखेरीस देशातील २१ टक्के लोकसंख्येमध्ये अँटिबॉडी विकसित झालेली होती. एप्रिलच्या अखेरीच यामध्ये ७ टक्के लोकसंख्येची भर पडण्याची शक्यता आहे. तर लसीकरणाच्या माध्यमातून देशातील १२ टक्के लोकसंख्येमध्ये प्रतिकारशक्ती विकसित होण्याची शक्यता आहे, त्यामुळे देशातील ४० टक्के लोकसंख्या ही कोरोनापासून मृत्यूच्या धोक्याबाहेर जाईल. एवढेच नाही तर २८ टक्के लोकसंख्येमध्ये संसर्गामुळे प्रतिकारशक्ती विकसित होई शकते. त्याशिवाय १२ टक्के लोक हे एप्रिलपर्यंत कोरोनाविरोधातील लसीचा पहिला डोस घेतील. दरम्यान, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांपैकी ८७ टक्के लोक हे ५० वर्षांपेक्षा अधिक वयाचे आहेत, असे या संशोधनामध्ये म्हटले आहे.
 
दरम्यान, दुसरीकडे लँसेट कोविड-१९ आयोगाने भारतात कोरोनाची दुसरी लाट वेळीच थोपवली गेली नाही तर जून २०२१ च्या पहिल्या आठवड्यापर्यंत देशात दररोज १ हजार ७५० ते २ हजार ३२० मृत्यू होतील, अशी भीती व्यक्त केली आहे. महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, दिल्ली, तामिळनाडू उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरातला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसेल, असेही या अहवालात म्हटले आहे. 
 

Read in English

Web Title: coronavirus: The second wave of corona will recede rapidly, with antibodies developing in up to 40 percent of people by the end of April

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.