Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली मोठी बैठक; कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 09:29 AM2021-05-02T09:29:03+5:302021-05-02T09:46:48+5:30

will Prime Minister Narendra Modi announce Lockdown?: एकीकडे पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल सुरु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi) देशात लॉकडाऊन करण्याच्या चर्चांना उधान आले आहे.

CoronaVirus: Prime Minister Narendra Modi to meet experts at 9:30 am today to review oxygen and medicine availability | Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली मोठी बैठक; कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली मोठी बैठक; कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार

Next

एकीकडे पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल सुरु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi) देशात लॉकडाऊन करण्याच्या चर्चांना उधान आले आहे. या निकालानंतर मोदी कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करतील अशी शक्यता वर्तविली जात होती. यावर गृहमंत्री अमित शहा यांनी काही दिवसांपूर्वीच लॉकडाऊनची गरज नसल्य़ाचे म्हटले होते. (Prime Minister Narendra Modi to meet experts at 9:30 am today to review oxygen and medicine availability.)


दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी ९.३० वाजता तज्ज्ञांसोबत महत्वाची बैठक बोलावली आहे. यामध्ये ते देशात गंभीर रुप घेतलेल्या कोरोनाला कसे रोखायचे, संकटाची व्याप्ती, देशभरातील ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा, रेमडेसीवीर तुटवडा आदींबाबत चर्चा करणार असल्याचे समजते. तसेच देशातील कोरोना योद्ध्यांच्या म्हणजेच मनुष्यबळावर देखील चर्चा करणार आहेत. 




नुकत्याच हाती आलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या २४ तासांत 3,92,488 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. तर 3689 जणांचा मृत्यू झाला आहे. 3,07,865 बरे झाले आहेत. 1 मे पासून अनेक ठिकाणी १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरणही सुरु झालेले नाही.

Read in English

Web Title: CoronaVirus: Prime Minister Narendra Modi to meet experts at 9:30 am today to review oxygen and medicine availability

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.