CoronaVirus : ॲम्ब्युलन्सवरून राजकारण, पप्पू यादव यांचा हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 03:28 AM2021-05-09T03:28:02+5:302021-05-09T03:28:37+5:30

यादव यांच्या आरोपानंतर राजीव प्रताप रुडी यांनी उत्तर देत म्हटले आहे की, पप्पू यादव यांनी चालक द्यावेत. आपण ॲम्ब्युलन्स देण्यास तयार आहोत.

CoronaVirus: Politics over ambulance, Pappu Yadav's attack | CoronaVirus : ॲम्ब्युलन्सवरून राजकारण, पप्पू यादव यांचा हल्लाबोल 

CoronaVirus : ॲम्ब्युलन्सवरून राजकारण, पप्पू यादव यांचा हल्लाबोल 

Next

छपरा : बिहारमध्ये कोरोना संकटाच्या काळात राजकारण, आरोप- प्रत्यारोपही सुरू आहेत. सारणचे संसद सदस्य राजीव प्रताप रुडी यांच्या मतदारसंघातील निधीतून खरेदी करण्यात आलेल्या ॲम्ब्युलन्सवरून जनअधिकार पार्टीचे अध्यक्ष पप्पू यादव यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. विश्वप्रभा हॉस्पिटल परिसरात उभ्या असलेल्या ३० ॲम्ब्युलन्सवरून सवाल करत म्हटले आहे की, एकीकडे ॲम्ब्युलन्सच्या कमतरतेमुळे रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत. तर, दुसरीकडे संसद सदस्यांच्या अंगणात उभ्या ॲम्ब्युलन्स घराची शोभा वाढवित आहेत. (CoronaVirus: Politics from ambulance, Pappu Yadav's attack)

यादव यांच्या आरोपानंतर राजीव प्रताप रुडी यांनी उत्तर देत म्हटले आहे की, पप्पू यादव यांनी चालक द्यावेत. आपण ॲम्ब्युलन्स देण्यास तयार आहोत. यावर पप्पू यादव यांनी ट्वीट केले की, आपण चालक देण्यास तयार आहोत.  छपरामध्ये ॲम्ब्युलन्स उभ्या असून या निष्काळजीपणाला जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यासह नेते दोषी असल्याचा आरोप पप्पू यादव यांनी केला आहे. 

काय केले आरोप?
-    पप्पू यादव यांनी म्हटले आहे की, रुडी हे केंद्रात कौशल्य विकास मंत्री होते. २०१६ मध्ये त्यांनी छपरा येथे चालक प्रशिक्षण संस्थेचा शुभारंभ केला होता.
-    पाच वर्षांत ते ७० चालकही तयार करू शकले नाहीत. जेणेकरून, ते चालक आज ॲम्ब्युलन्स चालवू शकले असते. पप्पू यादव सध्या कोरोना रुग्णांना मदत करत आहेत. पाटण्यातही ते रुग्णांना औषधी, ऑक्सिजन व अन्य मदत देत आहेत. 
 

Web Title: CoronaVirus: Politics over ambulance, Pappu Yadav's attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.