CoronaVirus: देशातील लॉकडाऊन ३ मेपर्यंत कायम राहणार;  पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 10:17 AM2020-04-14T10:17:25+5:302020-04-14T12:11:52+5:30

coronavirus: कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय

coronavirus pm narendra modi extends nationwide lockdown till 3 rd may kkg | CoronaVirus: देशातील लॉकडाऊन ३ मेपर्यंत कायम राहणार;  पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

CoronaVirus: देशातील लॉकडाऊन ३ मेपर्यंत कायम राहणार;  पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

Next

नवी दिल्ली: देशात लागू असलेला लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवत असल्याची मोठी घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे. राज्य सरकारांनी, स्थानिक स्वराज्य संस्थांनी उत्तम काम केलं आहे. प्रत्येकानं जबाबदारी ओळखून योगदान दिलं आहे. मात्र तरीही कोरोना पसरतो आहे. कमीत कमी नुकसान व्हावं, लोकांच्या अडचणी कमी करण्यासाठी राज्यांसोबत चर्चा केली. काही राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतल्याची घोषणा मोदींनी केली.




योग्य वेळी घेतलेल्या निर्णयांमुळे, लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगमुळे आपली स्थिती बलाढ्य देशांच्या तुलनेत चांगली असल्याचं मोदी म्हणाले. आपली तुलना कोणत्याही देशाशी तुलना करणं योग्य ठरणार नाही. पण जगातील बलाढ्य देशांशी तुलना करता आपण अतिशय चांगल्या स्थितीत आहोत. महिना दीड महिन्यापूर्वी बरेचसे देश आपल्या बरोबरीत होते. मात्र आत्ता तिथे कोरोनाचे रुग्ण २५ ते ३० पट आहेत. मृतांचा आकडा हजारोंच्या घरात आहे. आपण योग्य वेळी निर्णय घेतले नसते, तर आपली स्थिती काय असली असती, याची कल्पनाही करवत नाही. मागील दिवसांमधील स्थिती पाहिल्यास, आपण जे केलंय ते योग्य होतं याची खात्री पटते. लॉकडाऊन, सोशल डिस्टन्सिंगचा फायदा देशाला झाला. त्याची आर्थिक किंमत आपण चुकवली. पण देशाच्या नागरिकांच्या जीवापुढे ती किंमत काहीच नाही. अतिशय कमी संसाधनं असताना आपण उत्तम कामगिरी केली. त्याची जगभरात चर्चा होत आहे, अशा शब्दांत मोदींनी देशवासीयांनी दाखवलेल्या संयमाचं कौतुक केलं.



कोरोनाविरुद्धच्या लढ्यात एकजुटीनं लढत असल्याचं म्हणत हीच बाबासाहेब आंबेडकरांना वाहिलेली खरी श्रद्धांजली आहे, असं पंतप्रधान म्हणाले. या संकटकाळात देश मोठ्या मजबुतीनं लढतोय. देशवासीयांची तपस्या, त्यागामुळेच हे शक्य झालंय. कोरोना नियंत्रणात आणण्यात सगळ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. देशातली जनता मोठ्या कष्टानं देशाला वाचवतेय. या काळात देशवासीयांना सहन कराव्या लागणाऱ्या समस्यांची मला जाणीव आहे. मात्र अडथळे येऊनही सगळे जण कर्तव्य बजावत आहेत. बाबासाहेब आंबेजकर यांची आज जयंती आहे. आपण करत असलेले सामूदायिक प्रयत्न हीच बाबासाहेबांना वाहिलेली खरी श्रद्धांजली आहे, असं मोदींनी म्हटलं.

धक्कादायक! जितेंद्र आव्हाडांना तीन दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण; नगरसेवकाचा दावा

धक्कादायक! भारतासाठी येणारे टेस्टिंग किटचे जहाज अमेरिकेला पाठविले; WHO वर गंभीर आरोप

Web Title: coronavirus pm narendra modi extends nationwide lockdown till 3 rd may kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.