CoronaVirus: ...हा तर औरंगाबाद आणि हैदराबादच्या जनतेचा अपमान; ओवेसी पंतप्रधान मोदींवर भडकले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 10:02 AM2020-04-06T10:02:15+5:302020-04-06T10:05:31+5:30

Coronavirus कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बोलावण्यात आलेल्या बैठकीवरुन टीकास्त्र

coronavirus PM Modi insulted Hyderabad and aurangabad says Asaduddin Owaisi kkg | CoronaVirus: ...हा तर औरंगाबाद आणि हैदराबादच्या जनतेचा अपमान; ओवेसी पंतप्रधान मोदींवर भडकले

CoronaVirus: ...हा तर औरंगाबाद आणि हैदराबादच्या जनतेचा अपमान; ओवेसी पंतप्रधान मोदींवर भडकले

googlenewsNext

हैदराबाद: कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील महत्त्वाच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. यावरुन एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसींनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. मोदी देशातील सर्व नेत्यांशी चर्चा करणार आहेत. मात्र या चर्चेसाठी मला निमंत्रण देण्यात आलेलं नाही. हा हैदराबाद आणि औरंगाबादचा अपमान असल्याचं ओवेसींनी म्हटलंय.

पंतप्रधान मोदींनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगला ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनला (एआयएमआयएम) आमंत्रित करण्यात आलेलं नाही. हा औरंगाबाद आणि हैदराबादकरांचा अपमान असल्याची टीका ओवेसींनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. 'औरंगाबाद आणि हैदराबादकरांनी एमआयएमला पसंती दिली म्हणजे ते माणूस म्हणून कमी महत्त्वाचे आहेत का? तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करताय, यामागचं नेमकं कारण काय? आमच्या लोकांच्या व्यथा, मग त्या आर्थिक दृष्टीकोनातून असोत वा मानवतावादी दृष्टीकोनातून, त्या तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे आमचं काम आहे,' असं ओवेसींनी ट्विटमध्ये म्हटलं असून त्यात पंतप्रधान कार्यालयाला टॅगदेखील केलंय.



हैदराबाद आणि औरंगाबादच्या जनतेनं अनुक्रमे माझी आणि इम्तियाज जलील यांची निवड केली. आम्ही त्यांचे प्रश्न, समस्या मांडू यासाठी त्यांनी आम्हाला निवडून दिलं. मात्र आता आम्हाला त्यांच्या समस्याच मांडता येत नाहीत. हैदराबादमध्ये कोरोनाचे ९३ रुग्ण आढळून आले आहेत. या संकटाचा सामना कसा सामना कसा करायचा, ज्या भागांमध्ये आपण कमी पडतोय, तिथे काय करायचं, याबद्दलच्या काही संकल्पना मला मांडायच्या होत्या, असंदेखील ओवेसींनी पुढे म्हटलं. 

असदुद्दीन ओवेसींनी त्यांच्या ट्विटसोबत संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या कार्यालयाचं पत्र जोडलंय. पंतप्रधान राजकीय पक्षांच्या नेत्यांशी संवाद साधणार असल्याचा उल्लेख यात आहे. लोकसभा आणि राज्यसभेत मिळून पाचपेक्षा अधिक सदस्य असलेल्या राजकीय पक्षांच्या नेत्यांशी मोदी संवाद साधतील, असं यात नमूद करण्यात आलंय. एमआयएमचे लोकसभेत दोन सदस्य असून राज्यसभेत एकही प्रतिनिधी नाही.

Web Title: coronavirus PM Modi insulted Hyderabad and aurangabad says Asaduddin Owaisi kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.