Coronavirus:ए, बी, आरएच-पॉझिटिव्ह रक्तगटाच्या लोकांना कोरोना संसर्गाची अधिक जोखीम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 09:35 AM2021-12-02T09:35:19+5:302021-12-02T09:35:51+5:30

Coronavirus: कोरोनाच्या   ‘ओमायक्रॉन’ या  नवीन विषाणूने जग धास्तावले आहे. अनेक देशांनी प्रवासासंबंधी आवाहन जारी करून प्रतिबंध जारी केले आहेत.

Coronavirus: People with A, B, Rh-positive blood groups have a higher risk of coronavirus infection | Coronavirus:ए, बी, आरएच-पॉझिटिव्ह रक्तगटाच्या लोकांना कोरोना संसर्गाची अधिक जोखीम

Coronavirus:ए, बी, आरएच-पॉझिटिव्ह रक्तगटाच्या लोकांना कोरोना संसर्गाची अधिक जोखीम

googlenewsNext

नवी दिल्ली : कोरोनाच्या   ‘ओमायक्रॉन’ या  नवीन विषाणूने जग धास्तावले आहे. अनेक देशांनी प्रवासासंबंधी आवाहन जारी करून प्रतिबंध जारी केले आहेत. दरम्यानच्याकाळात सर गंगाराम रुग्णालयाने केलेल्या संशोधनाच्या निष्कर्षानुसार ए, बी. आणि आरएच-पॉझिटिव्ह रक्तगटाचे लोकांना कोरोना विषाणूूंचा संसर्ग होण्याची अधिक जोखीम असते. या गटाच्या तुलनेत ए, बी, ओ आणि आरएच-निगेटिव्ह रक्तगटाच्या लोकांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका खूप कमी असतो.
या रुग्णालयात ८ एप्रिल, २०२० आणि ४ ऑक्टोबर २०२० दरम्यान २,५८६ कोविड-१९ रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. हे सर्व रुग्ण कोरोनाबाधित होते. कोणत्या रक्तगटाचे लोकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची अधिक जोखीम असते, या शोध घेण्याचा रुग्णालयाचे डॉक्टर आणि तज्ज्ञांनी प्रयत्न केला.
बल्ड ट्रान्सफ्युजन विभागाचे डॉ. विवेक रंजन यांनी सांगितले की,  बी रक्तगटाच्या पुरुष रुग्णांत याच रक्तगटाच्या महिला रुग्णांच्या 
तुलनेत विषाणूचा अधिक धोका आढळला. बी-प्लस पुरुष रुग्णांना महिला रुग्णांच्या तुलनेत कोविड-१९चा धोका अधिक अही. बी आणि एबी रक्तगटाच्या ६० वर्षे वयाचे रुग्ण संसर्गाच्या दृष्टीने अधिक संवेदनशील आढळले. 

सिव्हीयर रेस्पिरेटरी सिंड्रोम कोरोना विषाणू-२
डॉ. रश्मी राणा यांनी सांगितले की, सिव्हीयर रेस्पिरेटरी सिंड्रोम कोरोना विषाणू-२ हा नवीन विषाणू आहे. रक्तगटात कोविड-१९ होण्याच्या जोखीमेशी संबंध आहे का? त्याचा शोध घेण्यासाठी कोरोना निदान चाचणी, बरे होण्यास लागणारा अवधी आणि मृत्युदराचा अभ्यास केला.

Web Title: Coronavirus: People with A, B, Rh-positive blood groups have a higher risk of coronavirus infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.