CoronaVirus कोरोनाग्रस्त देशांतून आलेल्यांना हॉटेलमध्येच ठेवणार; रोज ३१०० रुपयांचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 10:13 AM2020-03-18T10:13:42+5:302020-03-18T10:14:29+5:30

CoronaVirus जगभरात सुमारे ७९६४ जणांचा मृत्यू झाला असून भारतातही हा व्हायरस पाय रोवू लागला आहे. यामुळे सरकारने सर्वत्र खबरदारी घेतली आहे.

CoronaVirus paid quarantine facility available in hotels; rent Rs. 3100 per day hrb | CoronaVirus कोरोनाग्रस्त देशांतून आलेल्यांना हॉटेलमध्येच ठेवणार; रोज ३१०० रुपयांचा खर्च

CoronaVirus कोरोनाग्रस्त देशांतून आलेल्यांना हॉटेलमध्येच ठेवणार; रोज ३१०० रुपयांचा खर्च

Next

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने जगभरात चांगलेच थैमान घातले असून चीनमध्ये आटोक्यात आला आहे. मात्र, इटली आणि युरोपमध्ये या व्हायरसने मेटाकुटीस आणले आहे. जगभरात सुमारे ७९६४ जणांचा मृत्यू झाला असून भारतातही हा व्हायरस पाय रोवू लागला आहे. यामुळे सरकारने सर्वत्र खबरदारी घेतली आहे.

कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक महाराष्ट्रात आढळून आले आहेत. यानंतर दिल्ली, कर्नाटक राज्यांमध्ये अधिक रुग्ण आहेत. हा व्हायरस मुख्यकरून परदेशातून येत असल्याने तिकडे फिरण्यासाठी किंवा कामासाठी गेलेल्या नागरिकांना परतल्यानंतर हॉटेलमध्येच क्वारन्टाईन करण्यात येणार आहे. विमानतळावर कोरोना निगेटिव्ह आले तरीही त्यांना १४ दिवसांसाठी विलग व्हावे लागणार असून दिल्ली सरकारने विमानतळाबाहेर असलेल्या हॉटेलमध्ये या प्रवाशांची व्यवस्था केली आहे. या हॉटेलचा खर्चही प्रवाशांनाच करावा लागणार आहे.

हे प्रवासी आलेल्या देशांमध्ये जर कोरोनाचा संसर्ग झालेला असेल तर त्यांना येथे राहणे बंधनकारक केले आहे. द आयबीआयआएस हॉटेलचा पहिला आणि सहावा मजल्यावर ९२ खोल्या, द लेमन ट्रीच्या पाचव्या मजल्यावरील ५४ खोल्या, रेड क्रॉस हॉटेलचा पाचव्या मजल्यावरील ३६ खोल्या आरक्षित करण्यात आल्या आहेत.

नवी दिल्लीच्या जिल्हाधिकारी तन्वी गर्ग यांनी सांगितले की, पेड क्वारन्टाईन सुविधा घेणाऱ्या लोकांना दिवसाचे ३१०० रुपये द्यावे लागणार आहेत. यामध्ये सकाळचा नाश्ता, चहा, दुपारी आणि रात्रीचे जेवण, दोन पाणी बॉटल, चहा क़ॉफी बनविण्याचे साहित्य, वायफाय सुविधा मिळणार आहे. हॉटेलचे भाडे आगाऊ द्यावे लागणार आहे. त्यांच्या कपड्यांच्या धुण्याची व्यवस्थाही वेगळी करावी लागणार आहे. या मजल्यांवर सुरक्षा कर्मचारी तैनात असणार आहे. प्रवाशांना जेवण नष्ट होणाऱ्या प्लेटमध्येच दिले जाणार आहे.

CoronaVirus चाचणी निगेटिव्ह येऊनही सुरेश प्रभूंनी स्वत:ला केले विलग, कारण...

सामान्यांचं सोडा; संसदेलाच मिळेनात सॅनिटायझर आणि मास्क

दिल्लीमध्ये ऑटो रिक्षा, टॅक्सींचे निर्जंतुकीकरण केले जात आहे. यामुळे व्हायरस रोखला जाऊ शकतो असे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सांगितले आहे.

Web Title: CoronaVirus paid quarantine facility available in hotels; rent Rs. 3100 per day hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.