Omicron Variant : भारतातील 'त्या' संक्रमित डॉक्टरांनी स्वतःच सांगितली ओमायक्रॉनची लक्षणं, 'गुड न्यूज'ही दिली!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2021 02:28 PM2021-12-04T14:28:04+5:302021-12-04T14:32:32+5:30

डॉक्टरांनी सांगितले की, त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच त्यानी सर्वप्रथम स्वतःला क्वारंटाइन केले. त्यांची पत्नी आणि मुलांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे. बाधित डॉक्टर सध्या पूर्णपणे बरे आहेत. मात्र, ते अजूनही रुग्णालयातच आहे.

CoronaVirus Omicron in india infected doctor says he is absolutely fine know its symptoms | Omicron Variant : भारतातील 'त्या' संक्रमित डॉक्टरांनी स्वतःच सांगितली ओमायक्रॉनची लक्षणं, 'गुड न्यूज'ही दिली!

सांकेतिक छायाचित्र

Next


बेंगळुरू - भारतात ओमायक्रॉन या कोरोनाव्हायरसच्या नव्या व्हेरिअंटमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. ओमायक्रॉन भारतातही येऊन धडकला आहे. या आठवड्यात कर्नाटकात ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळून आले. यांपैकी एक 46 वर्षीय डॉक्टर आहे. मात्र संक्रमित डॉक्टर आता ठीक आहे. त्यांनी स्वत:च सांगितले, की त्यांना कुठलाही अधिक त्रास नाही. दक्षिण आफ्रिकेत आढळलेला हा नवा व्हेरिअंट अतिशय धोकादायक असून तो अत्यंत वेगाने पसरतो, असे बोलले जात आहे. अशा स्थितीत त्याची लक्षणेही वेगळी आहेत का? असा प्रश्नही केला जात आहे. बघुया, यासंदर्भात खुद्द संसर्ग झालेल्या डॉक्टरांनीच काय सांगितले?

संक्रमित डॉक्टरांनी इंग्रजी वृत्तपत्र टाइम्स ऑफ इंडियासोबत बोलताना सांगितले, की आजारापेक्षाही अधिक वेदनादायक गोष्ट म्हणजे घरात बंद राहणे आहे. डॉक्टरांनी सांगितले की, त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच त्यानी सर्वप्रथम स्वतःला क्वारंटाइन केले. त्यांची पत्नी आणि मुलांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे. बाधित डॉक्टर सध्या पूर्णपणे बरे आहेत. मात्र, ते अजूनही रुग्णालयातच आहे.

काय आहेत ओमायक्रॉनची लक्षणं?
ओमाक्रॉनच्या लक्षणांबाबत बोलताना ते म्हणाले की, त्यांना प्रचंड बॉडी पेन होत होते. याशिवाय त्यांना हलक्या स्वरुपाचा तापही होता, पण श्वास घेण्यास त्रास होत नव्हता. त्याची ऑक्सिजनची पातळीही सातत्याने सामान्य होती. त्यांना 21 नोव्हेंबरपासून ताप जानवू लागला होता. दुसऱ्याच दिवशी त्यांनी आरटी-पीसीआर चाचणीसाठी स्वॅब दिले. डॉक्टर म्हणाले, 'मला सर्दी नव्हती. तसेच मला केवळ 100 डिग्री फॅरेनहाइटपर्यंत ताप होता.

ओमायक्रॉन संक्रमणात असा केला गेला उपचार -  
संक्रमित आढळून आल्यानंतर डॉक्टर पहिल्या दिवशी घरीच थांबले. यानंतर त्यांनी खासगी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला. डॉक्टर पुढे म्हणाले, '२५ नोव्हेंबरला मला मोनोक्लोनल अँटीबॉडीजचा डोस देण्यात आला. याचा मला प्रचंड फायदा झाला. दुसऱ्या दिवशी माझ्यात कोरोनाचे कोणतेही लक्षण नव्हते. काही दिवसांपूर्वी एका व्हायरोलॉजिस्टने सांगितले होते की, मोनोक्लोनल अँटीबॉडीज किंवा कॉकटेल उपचारांचा ओमायक्रॉनवर फारसा परिणाम होत नाही.

कुटुंबातील सदस्यही संक्रमित -
डॉक्टरांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र याच दरम्यान पेशाने डॉक्टर असलेल्या त्यांच्या पत्नीलाही कोरोनाची लक्षणे दिसू लागली. यानंतर त्यांनी २६ नोव्हेंबरला चाचणी करायचे ठरवले. त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली. यानंतर त्यांच्या मुलीलाही कोरोनाची लागण झाली. पण नंतर त्या आरटी-पीसीआर चाचणीत निगेटिव्ह आल्या. तसेच, गुरूवारी जेव्हा डॉक्टरांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचे समजले, तेव्हा त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Web Title: CoronaVirus Omicron in india infected doctor says he is absolutely fine know its symptoms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.