CoronaVirus News: ऑक्सफर्ड लसीला ब्रिटनची मंजुरी; भारतात लवकरच मान्यतेची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2020 12:55 AM2020-12-31T00:55:16+5:302020-12-31T06:54:51+5:30

४ जानेवारीपासून ब्रिटनमध्ये लसीकरणाला सुरुवात, उच्च जोखमीच्या रुग्णांना प्राधान्य

CoronaVirus News: UK approves Oxford vaccine; Possibility of recognition in India soon | CoronaVirus News: ऑक्सफर्ड लसीला ब्रिटनची मंजुरी; भारतात लवकरच मान्यतेची शक्यता

CoronaVirus News: ऑक्सफर्ड लसीला ब्रिटनची मंजुरी; भारतात लवकरच मान्यतेची शक्यता

Next

लंडन/नवी दिल्ली : कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे त्रस्त असलेल्या ब्रिटनने आता कोरोनावरील ऑक्सफर्ड लसीला - कोविशिल्ड - मान्यता दिली आहे. या लसीचा पहिला डोस ४ जानेवारीपासून देण्यास सुरुवात होईल. ब्रिटिश सरकारने मान्यता दिलेली ही दुसरी लस आहे. भारतातही कोविशिल्ड लसीला लवकरच मान्यता मिळण्याची शक्यता आहे. 

सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लसीला देशात आपत्कालीन वापराला मंजुरी देण्यासंदर्भातील निर्णय बुधवारी तज्ज्ञ समितीने राखून ठेवला. कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लसीसंदर्भातील डेटाचे विश्लेषण करण्यासाठी आणखी कालावधी मिळावा अशी मागणी या समितीने केली. आता यासंदर्भातील बैठक १ जानेवारीला होणार आहे.

ऑक्सफर्ड लसीची वैशिष्ट्ये

लसीचे सांकेतिक नाव  एझेडडी१२२२ किंवा सीएचएडीओएक्स१ एनसीओव्ही-१९

साठवणुकीसाठी अत्यंत कमी तापमानाची आवश्यकता नाही स्वस्त आणि  मोठ्या प्रमाणात  उत्पादन शक्य वितरणासाठीही  सोपी सामान्यांना परवडण्याजोगी लस

परिणामकारक लस

एमएचआरएने ऑक्सफर्ड लसीला मान्यता दिल्याने ती वापरण्यास ‘सुरक्षित आणि परिणामकारक’ आहे यावर शिक्कामोर्तब झाल्याची प्रतिक्रिया ब्रिटनच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. हा ब्रिटिश शास्त्रज्ञांचा विजय असल्याचे मत पंतप्रधान बोरिस  जॉन्सन यांनी नोंदवले. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी शोधलेली आणि ॲस्ट्राझेनेका कंपनीने उत्पादित केलेल्या लसीची अलीकडेच सर्व परीक्षणे पूर्ण करण्यात आली होती. 

नव्या कोरोनाचे सात रूग्ण कर्नाटकात; देशात २१ जण आढळले

गेल्या महिनाभरात ब्रिटनमधून भारतात परतलेल्यांपैकी २१ जणांना नव्या कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. त्यामध्ये कर्नाटकमधील सात रुग्णांचा समावेश आहे. एक जण ठाण्यातही आढळला आहे. कर्नाटकमधील हा आकडा मंगळवारी तीन होता. ब्रिटनहून कर्नाटकात परतलेल्यांपैकी २६ जणांना कोरोनाची बाधा झाली होती. त्या राज्यातील सात जणांसह देशभरात २१ जणांना नव्या कोरोना विषाणूची बाधा झाली, असे कर्नाटक सरकारने सांगितले. 

Web Title: CoronaVirus News: UK approves Oxford vaccine; Possibility of recognition in India soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.