CoronaVirus News: कोरोनामुक्तीचा टक्का घसरला; रोज हजारोंनी रुग्णवाढ, केरळ, मध्य प्रदेशात पुन्हा स्थिती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 12:31 AM2021-02-23T00:31:31+5:302021-02-23T07:02:22+5:30

रोज हजारोंनी रुग्णवाढ, केरळ, मध्य प्रदेशात पुन्हा स्थिती गंभीर

CoronaVirus News: The situation is critical in Kerala and Madhya Pradesh | CoronaVirus News: कोरोनामुक्तीचा टक्का घसरला; रोज हजारोंनी रुग्णवाढ, केरळ, मध्य प्रदेशात पुन्हा स्थिती गंभीर

CoronaVirus News: कोरोनामुक्तीचा टक्का घसरला; रोज हजारोंनी रुग्णवाढ, केरळ, मध्य प्रदेशात पुन्हा स्थिती गंभीर

Next

नवी दिल्ली : देशात कोरोना पुन्हा मुसंडी मारत असल्याचे लक्षण आहे. दररोज हजारांच्या संख्येत रुग्णसंख्या वाढत आहेत. कोरोना मुक्तीचा दर घसरला आहे. महाराष्ट्र, केरळ, मध्यप्रदेशात पुन्हा भयावह स्थिती निर्माण होत असल्याची माहिती आयसीएमआरने दिली आहे.

२४ तासांमध्ये १४ हजार १९९ रूग्णांची भर पडली. तर, ८३ रूग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. दरम्यान ९ हजार ६९५ रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली. महाराष्ट्रात सर्वाधिक ६ हजार ९७१ कोरोनाबाधितांची भर पडली. तर, केरळमध्ये ४ हजार ७० कोरोनाबाधित आढळले. तामिळनाडू ४५२, कर्नाटक ४१३ तसेच पंजाबमध्ये ३४८ कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ नोंदवण्यात आली आहे.

लक्षणे जाणवतात  सहा महिन्यांनंतरही या संसर्गाची माफक वा मध्यम लक्षणे जाणवलेल्यांपैकी निम्म्या जणांना सहा महिन्यानंतरही याची लक्षणे जाणवत असल्याचे एका पाहणीत आढळून आले.  इस्रायली संशोधकांनी या संदर्भातील शोधनिबंध जर्नल ऑफ क्लिनिकल मायक्रोबायोलॉजी अँड इन्फेक्शन या नियतकालिकात प्रसिद्ध केला आहे.

Web Title: CoronaVirus News: The situation is critical in Kerala and Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.