CoronaVirus News: त्यांनी माझ्या आईला मारून टाकलं! कोविड सेंटर बाहेर आईचा मृत्यू; मुलानं फोडला टाहो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 09:48 AM2021-04-28T09:48:00+5:302021-04-28T09:48:32+5:30

CoronaVirus News: महिलेती प्रकृती गंभीर असतानाही वेळेवर उपचार नाही; महिलेनं कोविड सेंटरबाहेर प्राण सोडला

CoronaVirus News mother dies in auto outside covid center in delhi son keeps pleading for help | CoronaVirus News: त्यांनी माझ्या आईला मारून टाकलं! कोविड सेंटर बाहेर आईचा मृत्यू; मुलानं फोडला टाहो

CoronaVirus News: त्यांनी माझ्या आईला मारून टाकलं! कोविड सेंटर बाहेर आईचा मृत्यू; मुलानं फोडला टाहो

Next

दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात देशात पहिल्यांदा एका दिवसात १ लाख नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यानंतर अवघ्या अडीच आठवड्यांत हा आकडा ३ लाखांच्या पुढे गेला. गेल्या ६ दिवसांपासून देशात दररोज ३ लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे अनेक राज्यांमधील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. रुग्णांना वेळेत उपचार मिळत नसल्यानं त्यांचे अतोनात हाल होत आहेत. 

'त्या' १५० जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लावण्याच्या हालचाली; महाराष्ट्रातील किती जिल्हे?

राजधानी दिल्लीत काल एका कोरोनाग्रस्त महिलेनं रिक्षामध्येच प्राण सोडला. महिलेचा मुलगा मुकूल व्यास तिला दक्षिण दिल्लीतल्या सरदार वल्लभ भाई पटेल कोविड केअर सेंटरवर घेऊन आला होता. आईवर वेळेत उपचार व्हावेत म्हणून त्यानं बरेच प्रयत्न केले. मात्र सेंटरचं प्रवेशद्वार उघडण्यात आलं नाही. आईनं रिक्षातच प्राण सोडला आणि मुलानं फुटपाथवर टाहो फोडला.

राज्यात कडक निर्बंध 10 दिवस वाढणार?; आज मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

मुकूल व्यास त्यांची ५२ वर्षीय आई किरण व्यास यांना घेऊन कोविड केअर सेंटरबाहेर पोहोचले. आईला लवकरात लवकर उपचार मिळावेत यासाठी ३ तास त्यांचे प्रयत्न सुरू होते. मुकूल यांच्या भावानं आईची छातीवर पंप करून तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण हे सगळेच प्रयत्न तोकडे पडले. त्यांनी माझ्या आईला मारून टाकलं. आती मी घेऊन कुठे जाऊ, असा आर्त सवाल मुकूलनं विचारला.

मी इथे उभा राहून कित्येक तासांपासून वाट पाहत होतो. औपचारिकता पूर्ण करा, असं कोविड केअरचे कर्मचारी मला सांगत होते. मी आक्रोश करत होतो. रडत होतो. पण तरीही मदतीला कोणीच आलं नाही. आता माझी आई या जगात नाही. ती आम्हाला सोडून गेली आहे, अशा शब्दांत मुकूल यांनी त्यांची व्यथा मांडली. माझ्या आईची प्रकृती अतिशय गंभीर होती. आमच्या हातात खूप कमी वेळ होता. त्यातही मला औपचारिकता पूर्ण करायला सांगितल्या गेल्या. कोणीही संवेदनशीलपणा दाखवून मला मदत केली नाही, असं मुकूल यांनी सांगितलं.

Web Title: CoronaVirus News mother dies in auto outside covid center in delhi son keeps pleading for help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.