Coronavirus: महाराष्ट्रासह देशात कहर करणाऱ्या कोरोनाचा स्ट्रेन सापडला; 1000 पटींनी जास्त धोकादायक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 11:47 AM2021-05-03T11:47:49+5:302021-05-03T11:48:11+5:30

Coronavirus New Mutant N440K was infected Maharashtra, Karnataka: देशात पहिल्या लाटेचा एवढा प्रभाव जाणवलेला नसताना अचानक एवढी मोठी लाट कशी आली, याचे उत्तर हैदराबादच्या वैज्ञानिकांनी शोधले आहे.

Coronavirus New Mutant N440K found in India, maharashtra; 1000 times more contagious | Coronavirus: महाराष्ट्रासह देशात कहर करणाऱ्या कोरोनाचा स्ट्रेन सापडला; 1000 पटींनी जास्त धोकादायक

Coronavirus: महाराष्ट्रासह देशात कहर करणाऱ्या कोरोनाचा स्ट्रेन सापडला; 1000 पटींनी जास्त धोकादायक

Next

हैदराबाद : देशात कोरोनाची दुसरी लाट हाताबाहेर जात असल्याचे पाहून सर्वोच्च न्यायालयाने लॉकडाऊनचा (Lockdown) विचार करावा, अशा सूचना केंद्र आणि राज्य सरकारांना दिल्या आहेत. देशात पहिल्या लाटेचा (Corona Virus) एवढा प्रभाव जाणवलेला नसताना अचानक एवढी मोठी लाट कशी आली, याचे उत्तर हैदराबादच्या वैज्ञानिकांनी शोधले आहे. त्यांनी कोरोनाच्या जीवघेणा व्हायरस म्यूटेंटचा (Coronavirus New Mutant) शोध लावला आहे. धक्कादायक म्हणजे हा व्हायरस अन्य स्ट्रेनच्या तुलनेत 10 पटींनी अधिक संक्रमण करणारा आहे. या म्युटेंटमुळेच देशातील काही भागात कोरोनाने हाहाकार माजविला असल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे. (Coronavirus New Mutant N440K was infected Maharashtra, Karnataka and two other state.)

CoronaVirus: येत्या काही दिवसांत कोरोनाचा कहर कमी होणार? महाराष्ट्र, दिल्लीचे नंबर देत आहेत संकेत


देशभरात जो कोरोनाचा व्हायरस पसरला आहे, तो अन्य स्ट्रेनपेक्षा 10 ते 1000 पटींनी अधिक धोकादायक आहे. या म्युटेंटला 'N440K' नाव देण्यात आले आहे. या स्ट्रेनमुळेच देशात कोरोना हाताबाहेर गेला आहे. हा नवा व्हायरस आंध्रप्रदेशच्या करनूल शहरात पहिल्यांदा सापडला आहे. आता हा म्य़ुटेंट आंध, तेलंगानासह देशाच्या अन्य राज्यांमध्ये पसरला आहे. कोरोनाचे जेवढे रुग्ण सापडत आहेत, त्यापैकी एक तृतियांश रुग्ण हे याच व्हेरिअंटमुळे येत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. तसेच हा व्हायरस फैलावत आहे. 

Coronavirus News: कोरोना लढ्यात ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डानं भारताला केली लाख मोलाची मदत!


गेल्या दोन महिन्यांमध्ये देशातील 50 टक्के कोरोना रुग्ण हे चार राज्यांमध्ये सापडले आहेत. यामध्ये कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगाना आमि छत्तीसगड यांचा समावेश आहे. या चार राज्यांमध्ये कोरोनाचा हा नवा वेगवान स्ट्रेव पसरल्याचे संकेत देत आहे. हे संशोधन हैदराबादच्या सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी (CCMB) आणि गाझियाबादची अॅकॅडमी फॉम साइंटिफिक अँड इनोव्हेशन सेंटरच्या वैज्ञानिकांनी केले आहे.

विकृत चीन! भारतातील पेटत्या चितांवरून उडविली खिल्ली; कम्युनिस्ट पार्टीची जगभर नाचक्की

लॉकडाऊनचा विचार करा....

गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. दररोज जवळपास ४ लाख नवे कोरोनाबाधित सापडत आहे. अनेक राज्यांनी कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन किंवा कडक निर्बंध लादण्यास सुरूवात केली आहे. परंतु अद्यापही कोरोनाबाधितांची संख्या वाढतीच आहे. यामुळे आता आरोग्य व्यवस्थेवरही ताण येत आहे. अशा परिस्थिती कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊनचा विचार करावा असा सल्ला सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिला आहे. आम्ही केंद्र आणि राज्य सरकारांना सामूहिक कार्यक्रम आणि सुपर स्प्रे़डर कार्यक्रमांवर बंदी घालण्यासाठी रोख लावण्यावर विचार करण्यास सांगू असंही सर्वोच्च न्यायालयानं रविवारी पार  पडलेल्या सुनावणीदरम्यान म्हटलं. लोकांच्या हितासाठी दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊन लावण्यावर विचार करू शकतात असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं.

Web Title: Coronavirus New Mutant N440K found in India, maharashtra; 1000 times more contagious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.