CoronaVirus News : नवा उच्चांक! गेल्या 24 तासांत तब्बल 83,883 नवे रुग्ण, 38 लाखांचा टप्पा केला पार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 09:59 AM2020-09-03T09:59:05+5:302020-09-03T10:01:16+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातही कोरोनाचा धोका वाढत आहे. रुग्णांची संख्या सातत्याने नवा उच्चांक गाठत असून धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे.

CoronaVirus Marathi News Single day spike 83,883 new positive cases India | CoronaVirus News : नवा उच्चांक! गेल्या 24 तासांत तब्बल 83,883 नवे रुग्ण, 38 लाखांचा टप्पा केला पार

CoronaVirus News : नवा उच्चांक! गेल्या 24 तासांत तब्बल 83,883 नवे रुग्ण, 38 लाखांचा टप्पा केला पार

Next

नवी दिल्ली - संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल दोन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर आठ लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे देशातही कोरोनाचा धोका वाढत आहे. रुग्णांची संख्या सातत्याने नवा उच्चांक गाठत असून धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तब्बल 38,53,407 वर गेला आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी (3 सप्टेंबर) दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 83,883 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,043 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 38 लाख 53 हजारांवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 67 हजारांवर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 8,15,538 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 29,70,493 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.  देशात कोरोनाचा धोका वाढला असून गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. 

चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या ही सर्वाधिक आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई हा कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून ओळखला जात होता. मात्र आता मुंबई आणि दिल्लीला मागे टाकत पुणे हे शहर देशातील कोरोनाचा नवा हॉटस्पॉट बनला आहे. पुण्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सर्वात जास्त असल्याची माहिती मिळत आहे. दिल्लीमध्ये सोमवारपर्यंत कोरोनाचे 1,74,748 रुग्ण आढळून आले आहेत. तर पुण्यात 31 ऑगस्टपर्यंत तब्बल 175,105 कोरोनाग्रस्त आढळून आल्याची माहिती मिळत आहे. 

CoronaVirus News : दिल्ली, मुंबई नाही तर 'हे' शहर आहे कोरोनाचा नवा हॉटस्पॉट, चिंताजनक आकडेवारी

कोरोना व्हायरसमुळे पुण्यातील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. अनेक रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. पुण्यामध्ये आतापर्यंत 4069 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 1,18,324 लोक उपचारानंतर बरे झाले असून त्यांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. तसेच सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन, मास्क, होम आयसोलेशन यासारखे उपाय केले जात आहेत. 

CoronaVirus News : कोरोनाचा भयावह वेग! उपचारासाठी दाखल झाल्यानंतर 24 तासांत 31 टक्के रुग्णांचा मृत्यू

कोरोना रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल होताच 24 तासांत 31 टक्के रुग्णांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आले आहे. पण याच दरम्यान कोरोनाचा धडकी भरवणारा वेगही समोर आला आहे. कोरोनाची लक्षणं जाणवत नसतानाही अनेकांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह येत आहे. वेळीच कोरोनाचा धोका लक्षात न आल्यामुळे तसेच वेळेत उपचारासाठी दाखल न झाल्यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वाढत आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांचे विश्लेषण करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या समितीने दिलेल्या रिपोर्टमध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

"सुशांतच्या मृत्यूचे राजकारण करण्याचे पाप भाजपाला महागात पडेल"

"केंद्र सरकार 'हा' निर्णय एकट्याने घेऊ शकत नाही", ममता बॅनर्जींचा हल्लाबोल

'मलाही पंतप्रधानांना हेच सांगायचंय' म्हणत चिदंबरम यांनी मोदींचं 7 वर्षांपूर्वीचं 'ते' ट्विट केलं रिट्वीट

"मोदींच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेली संकटं", 'या' सहा मुद्दांवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल

माणुसकीला काळीमा! शुद्धीकरणासाठी तरुणीला केलं निर्वस्त्र, 400 लोकांसमोर घातली आंघोळ

 

Web Title: CoronaVirus Marathi News Single day spike 83,883 new positive cases India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.