CoronaVirus News : 'या' रुग्णांसाठी होम आयसोलेशन नाही; आरोग्य मंत्रालयाने बदलले नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 08:48 AM2020-07-03T08:48:03+5:302020-07-03T09:41:39+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंन्सिंग, क्वारंटाईन, होम आयसोलेशनच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे. मात्र आता केंद्रीय आरोग्य  मंत्रालयाने होम आयसोलेशनच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये काही बदल केले आहेत.

CoronaVirus Marathi News Patients With Comorbidities Elderly Not Eligible Home Isolation | CoronaVirus News : 'या' रुग्णांसाठी होम आयसोलेशन नाही; आरोग्य मंत्रालयाने बदलले नियम

CoronaVirus News : 'या' रुग्णांसाठी होम आयसोलेशन नाही; आरोग्य मंत्रालयाने बदलले नियम

Next

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. धोका वाढत असून देशातील रुग्णसंख्येने सहा लाखांचा टप्पा पार केला आहे. कोरोनामुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशांच्या क्रमवारीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे. पाच दिवसांत कोरोनाचे एक लाख नवे रुग्ण आढळून आले आहेत. देशातील रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ येत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंन्सिंग, क्वारंटाईन, होम आयसोलेशनच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे. मात्र आता केंद्रीय आरोग्य  मंत्रालयाने होम आयसोलेशनच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये काही बदल केले आहेत. 

देशातील रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. लोकांमध्ये कोरोनाची लक्षण दिसून येत नाही मात्र चाचणी पॉझिटिव्ह येत असल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे आता कोणतंही लक्षण नसलेल्या रुग्णांचा समावेश हा सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांमध्ये करण्यात येऊ शकतो. तसेच एचआयव्ही, कॅन्सर यासारख्या इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्ती होम आयसोलेशनसाठी योग्य नसल्याचं देखील नमूद करण्यात आलं आहे. 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्ती आणि उच्च रक्तदाब, मधमेह, हृदय आणि किडनी संबंधीत आजार असलेल्या मंडळींना वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानंतरच होम आयसोलेशनची परवानगी दिली जाईल असं देखील म्हटलं आहे. 

कोविड चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या अति सौम्य किंवा लक्षणे नसलेल्या रुग्णांना होम आयसोलेशन करण्यात येते. कोरोनाचे संक्रमण खंडित करण्यासाठी निदान झालेल्या रुग्णांना वैद्यकीयदृष्ट्या लक्षणानुसार, लक्षणे नसलेले, सौम्य किंवा अतिसौम्य लक्षणे, मध्यम तीव्र लक्षणे व तीव्र लक्षणांमध्ये वर्गीकृत केले जाते. त्यानुसार रुग्णांना कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर किंवा डेडिकेटेड कोविड रुग्णालयात येथे दाखल केले जाते. मात्र आता होम आयसोलेशनच्या नियमांत थोडा बदल करण्यात आला आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन हे बदल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांना लक्षण दिसून आल्यानंतर 10 दिवसांनी सोडण्यात येईल मात्र तीन दिवस ताप न आल्यास हे केलं जाईल. तसेच त्यानंतर त्यांना घरी एकटं राहण्याचा सल्ला दिला जातो. यामध्ये  त्यांनी पुढील सात दिवस आपल्या आरोग्याकडे नीट लक्ष द्यावे. होम आयसोलेशनचा कालावधी संपल्यावर कोणतीही चाचणी करण्याची गरज नाही. मात्र हे फक्त लक्षण नसलेल्या तसेच सौम्य आणि अति सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी लागू असल्याचं सुधारीत मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलं आहे.

होम आयसोलेशनच्या कालावधीत वैद्यकीय अधिकाऱ्यासोबत सतत कनेक्ट असणं गरजेचं आहे. त्यांना वेळोवळी प्रकृतीची माहिती द्या. त्यांच्या सल्ल्यानुसार औषधं घ्या. रुग्णाच्या फोनमध्ये आरोग्य सेतू अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड असणं महत्त्वाचं आहे. ब्ल्यूटूथ व वाय-फायद्वारे सतत कनेक्ट राहायला हवं. होम आयसोलेशन दरम्यान श्वास घेण्यास त्रास झाला अथवा इतरही काही त्रास झाल्यास तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्याची माहिती द्यावी आणि त्यांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. अशा रुग्णाच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या अनेक गोष्टी यामध्ये नमूद करण्यात आल्या आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

बारा रुपये दराने पेट्रोल खरेदी गेले अन् 12 वाजले; पाहा नेमके काय घडले

"चीनच्या आक्रमकतेसमोर झुकणार नाही हे भारताने दाखवून दिलं"

Video - ...अन् एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं; म्यानमारमधील खाणीत भूस्खलन, 50 जणांचा मृत्यू

CoronaVirus News : कोरोनाशी लढण्यासाठी देशाला 'या' पॅटर्नची गरज; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला

Sushant Singh Rajput Suicide : आत्महत्येपूर्वी सुशांतने गुगलवर 'हे' केलं होतं सर्च

Read in English

Web Title: CoronaVirus Marathi News Patients With Comorbidities Elderly Not Eligible Home Isolation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.