CoronaVirus News : कर्तव्यनिष्ठेला सलाम! कोरोनाग्रस्त नर्सनी दिली परीक्षा, मुख्यमंत्र्यांनी केलं भरभरून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 03:41 PM2020-06-23T15:41:08+5:302020-06-23T15:42:51+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना रुग्णांसाठी वैद्यकीय क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहेत. अशीच एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे.

CoronaVirus Marathi News Nurses Gave Examnination Isolation Ward | CoronaVirus News : कर्तव्यनिष्ठेला सलाम! कोरोनाग्रस्त नर्सनी दिली परीक्षा, मुख्यमंत्र्यांनी केलं भरभरून कौतुक

CoronaVirus News : कर्तव्यनिष्ठेला सलाम! कोरोनाग्रस्त नर्सनी दिली परीक्षा, मुख्यमंत्र्यांनी केलं भरभरून कौतुक

Next

कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. भारतासह जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे.कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र चिंतेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आहे. कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरू आहे. मात्र असे असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही चार लाखांच्या वर गेली आहे. कोरोना रुग्णांसाठी वैद्यकीय क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहेत. अशीच एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे.

कोरोनाची लागण झालेल्या दोन नर्सनी परीक्षा दिल्याची कौतुकास्पद घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबच्या पटियालामधील राजिंदरा रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या दोन नर्सना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र त्यांनी कोरोनासमोर हार न मानता, घाबरून न जाता परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या जिद्दीचं पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनीही भरभरून कौतुक केलं आहे. 

अमरिंदर सिंग यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. कोरोनाची लागण झालेल्या या दोन्ही नर्सनी विलगीकरण कक्षातून परीक्षा देण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली होती. त्यानुसार त्यांनी आता परीक्षा दिली आहे. "कोरोनाची लागण झालेल्या या दोन्ही नर्सच्या जिद्दीला सलाम. त्यांना निराशा न करता सरकारने विलगीकरण कक्षातून परीक्षा देण्याची परवानगी दिली होती" असं ट्विट अमरिंदर सिंग यांनी केलं आहे. 

मुख्यमंत्र्यांनी त्यांचा फोटो शेअर केल्यावर दोन्ही नर्सच्या जिद्दीला सर्वांनीच सलाम केला आहे. त्यांचा हा फोटो व्हायरल देखील होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. जगातील अनेक देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी तंत्रज्ञानाचा देखील मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. संसर्ग टाळण्यासाठी घराबाहेर पडताना मास्क लावणं आवश्यक आहे. अनेक ठिकाणी मास्क लावणं अनिवार्य करण्यात आलं असून न लावल्यास दंड आकारण्यात आला आहे. याच दरम्यान अनेक दिलासादायक घटना समोर येत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : लय भारी! 'या' देशाने तयार केला 'चमत्कारिक मास्क'; कोरोनाचा करणार 99 टक्के खात्मा

"देशावरील संकटांसाठी एनडीए सरकारची चुकीची धोरणं आणि भोंगळ कारभार जबाबदार", सोनिया गांधींचा हल्लाबोल

लॉकडाऊनमध्ये वर्क फ्रॉम होम महागात पडणार; 'या' लोकांना जास्त Income Tax द्यावा लागणार

Cyber Attack : बँक अलर्ट! SBI मध्ये अकाऊंट आहे?; मग अजिबात करू नका 'ही' चूक, वेळीच व्हा सावध

CoronaVirus News : काय सांगता? 'या' रुग्णालयात कोरोनाग्रस्तांसाठी TikTok थेरपी; डॉक्टरच देतात चॅलेंज

CoronaVirus News : आशेचा किरण! कोरोना हरणार, देश जिंकणार; 'ही' तीन औषधं व्हायरसला टक्कर देणार

Web Title: CoronaVirus Marathi News Nurses Gave Examnination Isolation Ward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.