CoronaVirus News: धक्कादायक; 'या'मुळे दिल्ली-मुंबईत मोठ्या प्रमाणावर वाढतायेत करोनाचे रुग्ण, आरोग्यमंत्र्यांनी सांगितले 'हे' कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 04:03 PM2020-05-04T16:03:39+5:302020-05-04T16:13:32+5:30

देशातील एकूण कोरोनाबाधितांपैकी 20 टक्के रुग्ण एकट्या मुंबईत आहेत. मुंबईमध्ये आतापर्यंत 8613 लोक कोरोनाबाधित आहेत. तर 343 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दिल्लीत आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 4549वर पोहोचला आहे.

CoronaVirus Marathi News health minister sayes people do not follow lockdown properly hence more cases of corona in delhi and mumbai sna | CoronaVirus News: धक्कादायक; 'या'मुळे दिल्ली-मुंबईत मोठ्या प्रमाणावर वाढतायेत करोनाचे रुग्ण, आरोग्यमंत्र्यांनी सांगितले 'हे' कारण

CoronaVirus News: धक्कादायक; 'या'मुळे दिल्ली-मुंबईत मोठ्या प्रमाणावर वाढतायेत करोनाचे रुग्ण, आरोग्यमंत्र्यांनी सांगितले 'हे' कारण

Next
ठळक मुद्देदेशाचा विचार करता राजधानी दिल्ली आणि मराराष्ट्राची राजधानी मुंबई येथे कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेतदेशातील एकूण कोरोनाबाधितांपैकी 20 टक्के रुग्ण एकट्या मुंबईत दिल्लीत आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 4549वर पोहोचला आहे

नवी दिल्ली : कोरोनाने संपूर्ण देशात हात-पाय पसरले आहेत. देशातील काही मोठी शहरंही कोरोनाने आपल्या विळख्यात घेतली आहेत. देशाचा विचार करता, राजधानी दिल्ली आणि मराराष्ट्राची राजधानी मुंबई येथे कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. लॉकडाउन असतानाही येथील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने आणि वेगाने वाढत आहे. यासंदर्भात, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी चिंता व्यक्त करत, या मागचे कारणही सांगितले आहे. 

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन म्हणाले, दिल्ली आणि मुंबई सारख्या शहरांमध्ये लोक लॉकडाउनचे व्यवस्थितपणे पालन करत नाहीत. यामुळेच या शहरांतील कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. तसेच देशाच्या ग्रामीण भागातील लोक लॉकडाउनचे चांगल्या प्रकारे पालन करत आहेत.

CoronaVirus, LockdownNews: कोरोनाचा धस्का; 'या' देशातील लोक म्हणतायेत, लॉकडाउन हटवले तरी घराबाहेर पडणार नाही

कोरोनाच्या बाबतीत ग्रामीण भागातील लोक अधिक सतर्क -
डॉ. हर्षवर्धन न्यूज18 शी बोलत होते. यावेळी त्यांना विचारण्यात आले, की दिल्ली आणि मुंबईसारख्या महानगरांमध्येच कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण का आहेत? यावर ते म्हणाले, 'मला वाटते, की दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये लोकांकडून लॉकडाउनचे व्यवस्थितपणे पालन केले जात नाही. मात्र, या लॉकडाउनसंदर्भात ग्रामीण भागातील लोक अधिक गंभीर आहे.'

'पदेशातून परतलेले सर्वाधिक लोक दिल्ली आणि मुंबईतच आले आहेत. दिल्ली आणि मुंबईत लोक मोठ्या प्रमाणावर झोपड्यांमध्ये राहतात. यामुळे येथे लॉकडाउनची अंमलबजावणी होणे कठीण आहे,' असेही डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.

हुतात्मा मेजर अनुज यांचा 2 वर्षांपूर्वीच झाला होता विवाह, IIT सोडून निवडला होता NDAचा मार्ग

दिल्ली मुंबईत सातत्याने वाढतायेत रुग्ण -
देशातील एकूण कोरोनाबाधितांपैकी 20 टक्के रुग्ण एकट्या मुंबईत आहेत. मुंबईमध्ये आतापर्यंत 8613 लोक कोरोनाबाधित आहेत. तर 343 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दिल्लीत आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 4549वर पोहोचला आहे. दिल्लीत रविवारी विक्रमी 427 नवे रुग्ण आढळले आहेत. 

रशियानं तयार केला 'महाबॉम्ब', एका क्षणात उद्ध्वस्त होऊ शकतं संपूर्ण जग

Web Title: CoronaVirus Marathi News health minister sayes people do not follow lockdown properly hence more cases of corona in delhi and mumbai sna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.