coronavirus: कोरोनाला रोखण्यासाठी केरळचं अजून एक पाऊल, गावागावात चाचणी करण्यासाठी सुरू केली ही सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 03:02 PM2020-05-30T15:02:08+5:302020-05-30T15:04:54+5:30

केरळमध्ये कोरोनाचे तुरळक रुग्ण सापडत असले तरी कोरोनाला रोखण्यात या राज्याला बऱ्यापैकी यश मिळाले आहे. दरम्यान, कोरोनाच्या संसर्गाला पायबंद घालण्यासाठी केरळने अजून एक पाऊल पुढे टाकले आहे.

coronavirus: Kerala Government launched mobile COVID19 testing vehicle for Village BKP | coronavirus: कोरोनाला रोखण्यासाठी केरळचं अजून एक पाऊल, गावागावात चाचणी करण्यासाठी सुरू केली ही सुविधा

coronavirus: कोरोनाला रोखण्यासाठी केरळचं अजून एक पाऊल, गावागावात चाचणी करण्यासाठी सुरू केली ही सुविधा

Next

कोचीन - कोरोना विषाणूच्या संसर्गाने भयंकर रूप घेतल्याने सध्या देशात चिंतेचे वातावरण पसरलेले आहे. अनेक मोठी शहरे कोरोनाच्या विळख्यात अडकली आहेत. काही राज्यांत तर कोरोनामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. मात्र या सर्वाला एक राज्य अपवाद ठरले आहे. ते राज्य म्हणजे केरळ.केरळमध्ये कोरोनाचे तुरळक रुग्ण सापडत असले तरी कोरोनाला रोखण्यात या राज्याला बऱ्यापैकी यश मिळाले आहे. दरम्यान, कोरोनाच्या संसर्गाला पायबंद घालण्यासाठी केरळने अजून एक पाऊल पुढे टाकले असून, आता केरळमधील अलप्पुझा जिल्ह्यात कोरोनाचा सामना करण्यासाठी कोविड१९ परीक्षण वाहन लाँच केले आहे. या वाहनाच्या अनावरणावेळी पीडब्ल्यूडी मंत्री जी. सुधाकरन उपस्थित होते.

या वाहनाच्या लाँचिगबाबत चर्चा करताना डॉक्टर प्रवीण यांनी सांगितले की, केरळच्या अलाप्पुझा जिल्ह्यात अशा वाहनाची गरज होती जे ग्रामीण भागात जाऊन कोरोना चाचणीचे नमुने एकत्र करू शकतील. आताच्या घडीला केरळमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्याबाबतची चिंता विचारात घेऊन या वाहनाची निर्मिती करण्यात आली आहे. या वाहनात टेलिमेडिसीन आणि सार्वजनिक उदघोषणा करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत.

केरळमध्ये शुक्रवारी कोरोनाचे ६२ रुग्ण सापडले होते. नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये एक आरोग्य कर्मचारी, एअर इंडिया एक्स्प्रेसच्या चालक दलाचे दोन सदस्य आणि दोन कैद्यांचाही समावेश होता. नव्याने सपडलेल्या रुग्णांमुळे कोरोनाबाधितांचा आकडा ११५० झाला आहे. दरम्यान, आखाती देशामधून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने राज्यात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा वाढून आठ एवढा झाला आहे.   

इतर महत्त्वाच्या बातम्या 

120 दिवस आधी रिझर्वेशन करता येणार, तात्काळ तिकीटही मिळणार; या तारखेपासून रेल्वे पूर्वीप्रमाणे सुविधा देणार

क्षेत्रफळ, लोकसंख्या, अर्थव्यवस्था आणि सैन्यक्षमता; असं आहे भारत आणि चीनचं बलाबल...  

शास्त्रज्ञांनी लावला कोरोना विषाणूला निष्क्रीय करणाऱ्या जीवाणूंचा शोध

गरज पडल्यास आमचे सैन्य लढण्यास तयार, नेपाळच्या संरक्षणमंत्र्यांची भारताला धमकी

 

Web Title: coronavirus: Kerala Government launched mobile COVID19 testing vehicle for Village BKP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.