CoronaVirus News: रशियन लस मिळवण्यास भारत धोरण तयार करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 02:54 AM2020-08-14T02:54:40+5:302020-08-14T06:45:05+5:30

टास्क फोर्सला घ्यायचेत महत्वाचे निर्णय

CoronaVirus India will formulate a policy to get Russian vaccine | CoronaVirus News: रशियन लस मिळवण्यास भारत धोरण तयार करणार

CoronaVirus News: रशियन लस मिळवण्यास भारत धोरण तयार करणार

googlenewsNext

- हरीश गुप्ता 

नवी दिल्ली : कोरोनाला रोखण्यासाठी रशियन लस मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उच्चाधिकार टास्क फोर्स (समिती) धोरण निश्चित करेल. या फोर्सचे प्रमुख आहेत डॉ. व्ही. के. पॉल.

अनेक सदस्य असलेल्या या समितीची बुधवारी बैठक झाली ती काही फक्त रशियन लस स्पुटनिक-व्हीची गुणवत्ता किती याचा अहवाल मोदी यांना देण्यासाठीच नाही तर ती लस किती प्रमाणात घ्यायची आणि त्यासाठीच्या निधीची व्यवस्था कशी असावी याबद्दलही होती.

या समितीला महत्वाचा निर्णय घ्यायचा आहे तो म्हणजे जगात वेगवेगळ्या ठिकाणी उत्पादन होत असलेल्या इतर अनेक कोविड लशीही मिळवण्याबाबत. भारत सरकारने कोविड लशींवरील संशोधन आणि त्या विकसित करण्यासाठी कोणताही निधी दिलेला नाही. तीन पाश्चिमात्य आणि दोन चिनी अशा पाच लशी उत्पादनाच्या प्रगतीच्या टप्प्यावर आहेत. त्या सगळ्या गुणवत्तेच्या टप्पा ३ वर आहे.

स्विडीश-ब्रिटिश औषध ग्रुप अ‍ॅस्ट्रा झेनिकासोबत काम करत असलेल्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीला येत्या सप्टेंबरअखेर निष्कर्ष निघण्याची आशा आहे तर यु. एस. नॅशनल इन्स्टिट्यूटस ऑफ हेल्थसोबत भागीदार असलेली अमेरिकेची बायोटेक कंपनी मोडेर्ना या वर्षअखेरचे (बहुधा नोव्हेंबर) लक्ष्य ठेवून आहे. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने जवळपास १० अब्ज डॉलर्स सात लशी विकसित करणाऱ्यांवर खर्च केले असून त्यापैकी पाच जणांशी जवळपास एक अब्ज मात्रा उत्पादनासाठी करार केले आहेत.

जपानदेखील तीन पुरवठादारांशी वाटाघाटी करत आहे आणि ब्रिटनदेखील अशा उत्पादकांशी अशा प्रकारचे करार करत आहे.
परंतु, भारत स्वत:च्या कोनव्हाक्सिनवर विसंबून आहे. ते भारत बायोटेक-आयसीएमआर आणि झायडस एकत्रितपणे उत्पादन करत आहे. अर्थात ती टप्पा-एक आणि टप्पा-२ चाचणीच्या पायरीवर आहे. टास्क फोर्सला रशियन लशीबाबत तातडीने भूमिका घ्यायची आहे कारण रशिया भारताचा मित्र देश आहे. या बैठकीला असलेली परराष्ट्र मंत्रालयातील सचिवाची उपस्थिती हेच दर्शवते की, भारत रशियन लस मिळवायचा प्रयत्न करेल. त्यासाठीची पद्धत अंतिम केली जात असल्याचे या सूत्रांनी सांगितले.

एकत्रितपणे उत्पादन
भारत स्वत:च्या कोनव्हाक्सिनवर विसंबून आहे. ते भारत बायोटेक-आयसीएमआर आणि झायडस एकत्रितपणे उत्पादन करत आहे. अर्थात ती टप्पा-एक आणि टप्पा-२ चाचणीच्या पायरीवर आहे. टास्क फोर्सला रशियन लशीबाबत तातडीने भूमिका घ्यायची आहे या बैठकीला असलेली परराष्ट्र मंत्रालयातील सचिवाची उपस्थिती हेच दर्शवते की, भारत रशियन लस मिळवायचा प्रयत्न करेल.

Web Title: CoronaVirus India will formulate a policy to get Russian vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.