Coronavirus: दिलासा कायम, गेल्या २४ तासांत नव्या रुग्णसंख्येत पुन्हा मोठी घट, कोरोनामुक्तांचे प्रमाणही वाढले 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 09:46 AM2021-06-13T09:46:52+5:302021-06-13T09:47:41+5:30

Coronavirus In India: गेल्या काही दिवसांपासून एक लाखांच्या आत असलेले नव्या रुग्णांचे प्रमाण आता ८० हजारांपर्यंत खाली घसरले आहे. तर नव्या रुग्णांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांचेही प्रमाण अधिक राहिले आहे.

Coronavirus: India reports 80,834 new COVID19 cases and 3,303 deaths in the last 24 hours | Coronavirus: दिलासा कायम, गेल्या २४ तासांत नव्या रुग्णसंख्येत पुन्हा मोठी घट, कोरोनामुक्तांचे प्रमाणही वाढले 

Coronavirus: दिलासा कायम, गेल्या २४ तासांत नव्या रुग्णसंख्येत पुन्हा मोठी घट, कोरोनामुक्तांचे प्रमाणही वाढले 

Next

नवी दिल्ली - गेल्या २४ तासांमध्ये देशातील कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा मोठी घट नोंदवली गेली आहे. गेल्या काही दिवसांपासून एक लाखांच्या आत असलेले नव्या रुग्णांचे प्रमाण आता ८० हजारांपर्यंत खाली घसरले आहे. तर नव्या रुग्णांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांचेही प्रमाण अधिक राहिले आहे. (Coronavirus In India) मात्र चिंतेची बाब म्हणजे देशातील दैनंदिन मृत्यूंची संख्या मात्र अद्यापही तीन हजारांच्या वर नोंदवली जात आहे. (India reports 80,834 new COVID-19 cases, 1,32,062 patient discharges, and 3,303 deaths in the last 24 hours, as per Union Health Ministry)

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत देशामध्ये कोरोनाच्या ८० हजार ८३४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच काल दिवसभरात देशात कोरोनामुळे तीन हजार ३०३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात १ लाख ३२ हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.  त्यामुळे देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांचे प्रमाण अधिकच घटले आहे. 



दरम्यान, गेल्या २४ तासांतील ८० हजार ८३४ रुग्णांच्या वाढीमुळे देशातील एकूण रुग्णसंख्या ही २ कोटी ९४ लाख ३९ हजार ९८९ एवढी झाली आहे. तर काल दिवसभरात झालेल्या ३ हजार ३०३ मृत्यूंमुळे देशातील आतापर्यंतच्या कोरोनाबळींचा आकडा ३ लाख ७० हजार ३८४ वर पोहोचला आहे. दिलासादायक बाब म्हणजे देशातील कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सातत्याने वाढत असून, काल १ लाख ३२ हजार ०६२ रुग्णांनी कोरोनावर मात केली त्यामुळे देशातील एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २ कोटी ८० लाख ४३ हजार ४४६ एवढी झाली आहे.
 
देशात सध्या १० लाख २६ हजार १५९ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. तर देशातील लसीकरणाचा वेगही वाढत असून, आतापर्यंत २५ कोटी ३१ लाख ९५ हजार ४८ जणांना कोरोनावरील लसीचा डोस देण्यात आला आहे. 

Web Title: Coronavirus: India reports 80,834 new COVID19 cases and 3,303 deaths in the last 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.