Coronavirus: Hacking Aarogya Setu can win you ₹1 lakh to ₹3 lakh pnm | Coronavirus: आरोग्य सेतू अ‍ॅपमधून १ लाख रुपये कमवण्याची संधी; फक्त करावं लागणार ‘हे’ काम!

Coronavirus: आरोग्य सेतू अ‍ॅपमधून १ लाख रुपये कमवण्याची संधी; फक्त करावं लागणार ‘हे’ काम!

ठळक मुद्देआरोग्य सेतू अ‍ॅपमधून भारतीयांचा डेटा लीक करण्याची हॅकरची धमकी हॅकरच्या धमकीनंतर आरोग्य सेतू अ‍ॅपच्या सुरक्षेवर विरोधकांचे प्रश्नचिन्ह आरोग्य सेतू अ‍ॅपमधील त्रुटी दाखवल्यास एक लाखाचं बक्षीस देण्याची योजना

नवी दिल्ली – कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करण्याची सूचना सर्व नागरिकांना दिली आहे. मात्र या अ‍ॅपच्या माध्यमातून डेटा लीक होत असल्याचा दावा काही जणांनी केला होता. त्यामुळे आरोग्य सेतू अ‍ॅपसाठी बग बाउंटी प्रोग्राम जाहीर केला आहे. यासाठी, लोक अँड्रॉइड आवृत्तीचा अ‍ॅप स्त्रोत कोड पाहू शकतात आणि ते कोडचा रिव्यू करुन सुधारणेबद्दल सूचना देऊ शकतात, त्याचसोबत त्यातील काही कमकुवतता शोधू शकतात. संपूर्ण देशातील सुरक्षा संशोधक आणि विकासकांच्या सहकार्याने अ‍ॅपची सुरक्षा सुधारविणे आणि त्याला प्रोत्साहन देणे त्याचे उद्दीष्ट आहे. एक चूक आढळल्यास १ लाख रुपये मिळतील. त्याअंतर्गत ३ लाख रुपयांपर्यंतचे बक्षीस जिंकण्याची संधी आहे.

हा कार्यक्रम भारतात राहणार्‍या प्रत्येक नागरिकासाठी आहे. भारताबाहेरील रहिवासी देखील त्यात सबमिट करू शकतात, परंतु ते कोणत्याही बक्षीस पात्र ठरणार नाहीत. तथापि, त्यांना शॉर्टलिस्ट केल्यावर प्रमाणपत्र मिळेल. हा कार्यक्रम २७ मे ते २६ जून या कालावधीत चालणार आहे.

आरोग्य सेतू अ‍ॅप मुक्त स्त्रोत संशोधन समुदायासाठी उपलब्ध करुन देण्यात येईल. प्रोग्राम अंतर्गत, संशोधक आणि वापरकर्त्यांसह सर्व लोकांना सहभागी करुन घेतलं आहे. अ‍ॅपच्या गोपनीयता आणि सुरक्षिततेवर परिणाम होणार्‍या कोणत्याही त्रुटींबद्दल ते माहिती देऊ शकतात. संशोधकांना सुरक्षा किंवा गोपनीयतेशी संबंधित काही गडबड आढळल्यास त्यांना as-bugbounty@nic.in वर सूचित करावे लागेल. ते सिक्युरिटी व्हेनेरेबिलिटी रिपोर्ट हा विषय लिहून पाठवावे लागेल.

आरोग्य सेतूची टीम याची पडताळणी करेल आणि नंतर त्याचे निराकरण करेल. केवळ या प्रक्रियेद्वारे पाठविणारेच या बक्षीस पात्र ठरणार आहेत. सोर्स कोडमधील कोणत्याही सुधारणेबाबत as-bugbounty@nic.in वर पाठविली जाऊ शकते. यासाठी, स्क्रीनशॉट आणि पीओसी असलेल्या कमतरतेचा तपशील व्हिडिओद्वारे पाठवावा लागेल.

कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी नीती आयोगाकडून आरोग्य सेतू अ‍ॅप २ एप्रिल २०२० रोजी लॉन्च केले होते, यामाध्यमातून लोकांना आपल्या आजूबाजूला कोरोना संक्रमित व्यक्ती नाही हे माहिती होते. या अ‍ॅपमध्ये कोरोनाशी संबंधित बरीच महत्त्वाची अपडेट देण्यात आली असून आता या अ‍ॅपच्या मदतीने ऑनलाईन वैद्यकीय सल्लेही घेता येतील. अ‍ॅपमध्ये जोडलेली आरोग्य सेतू मित्र नावाची सुविधा वापरुन टेलिमेडिसिनची सुविधा (फोनद्वारे डॉक्टरांचा सल्ला) घेता येईल. आरोग्य सेतू अ‍ॅप १२ भाषांमध्ये उपलब्ध आहे.

फ्रान्समधील हॅकर Robert Baptiste ने एक ट्विट करून आरोग्य सेतू अ‍ॅपवरून भारतीयांची माहिती उघड होण्याचा दावा केला होता. त्यामुळे आरोग्य सेतू अ‍ॅपबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. त्यानंतर हा अ‍ॅप खासगी संरक्षण, सुरक्षा आणि डेटा सुरक्षिततेच्या बाबतीत पूर्णपणे मजबूत आहे असं केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले होते.

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Coronavirus: Hacking Aarogya Setu can win you ₹1 lakh to ₹3 lakh pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.