CoronaVirus : लाजिरवाणं! रुग्णालयात जाणाऱ्यांना बाइकवरून उतरवलं अन् बेडकासारखं चालायला लावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 01:28 PM2020-03-31T13:28:05+5:302020-03-31T13:28:54+5:30

त्यांना बाइकवरून उतरवून कोंबड्यासारखं बसण्यास भाग पाडण्यात आलं, त्यानंतर त्यांना बेडकासारखं चालण्यास सांगण्यात आलं.

CoronaVirus : gopalganj police punished injured youth going to hospital in gopalganj during lockdown on road vrd | CoronaVirus : लाजिरवाणं! रुग्णालयात जाणाऱ्यांना बाइकवरून उतरवलं अन् बेडकासारखं चालायला लावलं

CoronaVirus : लाजिरवाणं! रुग्णालयात जाणाऱ्यांना बाइकवरून उतरवलं अन् बेडकासारखं चालायला लावलं

Next

गोपाळगंजः देशभरात लॉकडाऊन असतानाही अनेक जण रस्त्यावर फिरताना दिसतात. पोलिसांच्या कडक बंदोबस्तालाही ही मंडळी जुमानत नाही. मग त्यांना बऱ्याचदा पोलिसी हिसका दाखवला जातो. परंतु लॉकडाऊनदरम्यान पोलिसांचा निष्ठुरपणाही समोर येतो आहे. लॉकडाऊनच्या काळात दोन जखमींना बाईकवरून रुग्णालयात नेणाऱ्या बाइकस्वाराला अडवण्यात आलं. तसेच त्यांना बाइकवरून उतरवून कोंबड्यासारखं बसण्यास भाग पाडण्यात आलं, त्यानंतर त्यांना बेडकासारखं चालण्यास सांगण्यात आलं. त्याचदरम्यान पीडित मुलं पोलिसांकडे याचना करत होती. रुग्णालयात जाऊ देण्याची विनवणी करत होते. परंतु पोलिसांनी त्यांचं काहीही ऐकलं नाही. बिहारमधल्या गोपाळगंज भागात हे प्रकरण घडलं असून, लोकांनी संताप व्यक्त केला आहे. 

दोन जखमींना रुग्णालयात घेऊन जात होता बाइकस्वार
सोमवारी बंजारी गावातून बाइकवर बसून तीन जण बंजारी चौकात पोहोचले. एका तरुणाच्या डोक्याला दुखापत झालेली होती. त्याच्या डोक्याला बँडेज लावण्यात आलं होतं आणि त्या बँडेजवर रक्ताचे डागही दिसत होते. तर दुसऱ्या तरुणाच्या अंगठ्याला मार लागला होता. अंगठ्याला मोठी जखम झाल्यानं तीसुद्धा बँडेजनं बांधण्यात आली होती. त्यांना नीट उभंसुद्धा राहता येत नव्हतं. तर बाइक चालवणारी व्यक्ती सृदृढ होती. तिन्ही तरुण बंजारी चौकात पोहोचल्यानंतर ड्युटीवर तैनात असलेल्या पोलिसांनी बाइकवरून तिघांना उतरवलं. त्यानंतर त्यांना कोंबड्यासारखं बसण्यास सांगण्यात आलं. कोंबड्यासारखं बसण्यास सांगण्यात आल्यानंतर त्यांना बेडकासारखं चालण्यास भाग पाडलं. अंगठ्याला दुखापत झाली असल्यानं तरुणाला चालताही येत नव्हतं. 

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. कडक नियमांची अंमलबजावणी व्हावी, यासाठी गोपाळगंजमधील विविध चौक आणि रस्त्यांवर पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. परंतु या लॉकडाऊनमध्ये रुग्ण व रुग्णालयात जाणाऱ्या लोकांना सूट देण्यात आली आहे. लोक त्यांच्या दैनंदिन गरजा व बँकेशी संबंधित कामांसाठी, तसेच खरेदी करण्यासाठी बाहेर जाऊ शकतात. मात्र, तिन्ही तरुणांना शिक्षा दिल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना रुग्णालयात जाण्याची परवानगी दिली. दुखापतग्रस्त तरुणांनी पोलिसांना सोडण्याची विनंती केली, पण त्याने त्यांचे ऐकले नाही. त्यामुळे गोपाळगंज परिसरातून या कृतीचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. 

Web Title: CoronaVirus : gopalganj police punished injured youth going to hospital in gopalganj during lockdown on road vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.