CoronaVirus ड्रायव्हिंग लायसन, इन्शुरन्स, पीयुसीची मुदत संपली? गडकरींची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 09:57 PM2020-05-06T21:57:49+5:302020-05-06T22:00:15+5:30

ड्रायव्हिंग लायसन, इन्शुरन्स, पीयुसीची मुदत संपल्यामुळे लॉकडाऊन काळात मोठे संकट ओढवले होते. पोलिसांकडून सुरु असणारी कडक तपासणीमुळे अत्यावश्यक कारणासाठी वाहने बाहेर काढणेही गुन्हा ठरू लागले होते.

CoronaVirus Driving license, insurance, PUC expired? Nitin Gadkari's big announcement hrb | CoronaVirus ड्रायव्हिंग लायसन, इन्शुरन्स, पीयुसीची मुदत संपली? गडकरींची मोठी घोषणा

CoronaVirus ड्रायव्हिंग लायसन, इन्शुरन्स, पीयुसीची मुदत संपली? गडकरींची मोठी घोषणा

googlenewsNext

नवी दिल्ली : कोरोनामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. यामुळे अनेक सरकारी कामे खोळंबली आहेत. महत्वाचे म्हणजे वाहन चालविण्याचे लायसन, वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट आदी अनेक गोष्टींची मुदत संपलेली आहे. अशा लोकांना केंद्रीय मोटार वाहन नियमांमधून सूट देण्यात आली असून या मुदत संपलेल्या कागदपत्रांना ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली आहे. 


देशातील ज्यांच्या ड्रायव्हिंग लायसन, वाहनाचे दस्तावेज, पीयुसी सारख्या कागदपत्रांची मुदत १ फेब्रुवारी ते ३० जून च्या कालावधीत संपत आहे, त्यांची मुदत ३० जून २०२० पर्यंत वाढविण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे या कागदपत्रांचे नुतनीकरण अशक्य आहे. मोटार वाहन अधिनियम १९८८ आणि  मोटार वाहन अधिनियम १९८९ नुसार ही मुदत वाढविण्यात आली आहे. 


कोणतेही वाहन चालविताना चार कागदपत्रे महत्वाची असतात. यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, इन्शुरन्स आणि पीयूसी असणे गरजेचे आहे. जर तुम्ही हार्ड कॉपी ठेवू शकत नसाल तर मोबाईल अॅपवर डिजिटल कॉपी ठेवली तरी चालणार आहे. यासाठी डिजिलॉकर किंवा एम परिवाहन हे अॅप वापरावे लागणार आहे. 
नवीन वाहतूक नियम लागू करताना गडकरींनी शिस्त लावण्यासाठी दंडामध्ये १० पटींनी वाढ केली होती. दारू पिऊन वाहन चालविल्यास १० हजारांचा दंड आकारण्यात येत आहे. अल्पवयीन वाहन चालविताना सापडल्यास वाहन मालकाला तुरुंगवासाची शिक्षा करण्यात येणार आहे. 

 

महत्वाच्या बातम्या...

मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा १०००० पार; आज ७५९ नवे रुग्ण

OMG! राज्यात कोरोनाचा 'विस्फोट'; नव्या रुग्णांच्या संख्येने सरकारची चिंता वाढली

CoronaVirus धारावीने चिंता वाढवली; नव्या रुग्णांमध्ये मोठी वाढ

CoronaVirus व्वा...! राज्यात केवळ दोन दिवसांत ७०० रुग्ण ठणठणीत झाले

Web Title: CoronaVirus Driving license, insurance, PUC expired? Nitin Gadkari's big announcement hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.