Coronavirus: शेकडो रुग्णांची तपासणी करणाऱ्या डॉक्टरलाच कोरोनाची लागण; संपूर्ण रुग्णालयात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 01:28 PM2020-03-18T13:28:00+5:302020-03-18T13:37:30+5:30

रुग्णांची तपासणी करणाऱ्या एका डॉक्टरलाच कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याने आता संपूर्ण रुग्णालय कोरोनाच्या संशयात आले आहे.

Coronavirus: The doctor who examined the patients had a corona virus infection mac | Coronavirus: शेकडो रुग्णांची तपासणी करणाऱ्या डॉक्टरलाच कोरोनाची लागण; संपूर्ण रुग्णालयात खळबळ

Coronavirus: शेकडो रुग्णांची तपासणी करणाऱ्या डॉक्टरलाच कोरोनाची लागण; संपूर्ण रुग्णालयात खळबळ

Next

नवी दिल्ली: चीनमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे 7000 हून अधिक लोक मृत्युमुखी पडले असून हजारो लोकांना त्याची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा धोका टाळ्यासाठी सर्व राज्यातील प्रशासन आणि डॉक्टर मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे. परंतु रुग्णांची तपासणी करणाऱ्या एका डॉक्टरलाच कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याने आता संपूर्ण रुग्णालय कोरोनाच्या संशयात आले आहे.

स्पेनवरुन आल्यानंतर डॉक्टरला बारीक ताप आला होता. मात्र ताप असूनही डॉक्टरने स्वत:ची तपासणी केली नाही. तसेच रुग्णालयाने देखील याकडे दूर्लक्ष केल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनाची लागण झालेल्या डॉक्टरने यादरम्यान ओपीडीत जाऊन रुग्णांची तपासणीही केली. आपल्या मित्रांनाही ते भेटले आणि काम करत राहिले. यानंतर त्यांना कोरोनाची लक्षणं दिसू लागल्याने कोरोनाची तपासणी केली. या तपासणीनंतर डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचे रिपोर्ट समोर आले आहे.

कोचीत काम करणारे डॉक्टर दीपक दामोधरन याबाबत माहिती देताना म्हणाले की, स्पेनवरुन परतलेल्या डॉक्टरमध्ये २ ते ५ मार्च दरम्यान सुरुवातीला काही लक्षणं आढळून आली. ८ मार्चला घशात दुखू लागलं. ९ मार्च त्याने आपल्या विदेश दौऱ्याची माहिती राज्य सरकारला दिली. यानंतर त्या डॉक्टरना तात्काळ घरातच विलगीकरण करण्यात आलं. यानंतर कोरोनाच्या तपासणीत ते डॉक्टर पॉझिटिव्ह आढळून आल्याचे  दीपक दामोधरन यांनी सांगितले. तसेच कोरोनाची लागण झालेल्या त्या डॉक्टरांच्या मित्रांना, रुग्णालयातील स्टाफला देखील कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. ज्या रुग्णांना तपासलं त्यांनाही करोना होण्याची शक्यता आहे. त्यांना कसं शोधून काढणार? हा मोठा प्रश्न आहे, असं मत दीपक दामोधरन व्यक्त केले आहे.

दरम्यान, भारतात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. 122 भारतीयांना आणि 25 परदेशी व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. आतापर्यंत दिल्लीमध्ये एक, कर्नाटकात एक आणि महाराष्ट्रात एक अशा एकूण 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आंध्र प्रदेशनमध्ये 1, दिल्लीमध्ये 10, हरियाणामध्ये 16, कर्नाटकात 11, केरळमध्ये 27, महाराष्ट्रात 42, ओडिशामध्ये 1, पंजाबमध्ये एका व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या 

Coronavirus: एकूण 4 टप्पे! भारतात कोणत्या टप्प्यात आहे 'कोरोना'?, जाणून घ्या  

Coronavirus: राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 42वर, पुण्यात आढळला आणखी एक रुग्ण 

Coronavirus: सामान्यांचं सोडा; संसदेलाच मिळेनात सॅनिटायझर आणि मास्क

Coronavirus : कोरोनानं लष्करातील जवानही संक्रमित; देशातील रुग्णांची संख्या 140वर

MP Crisis: ‘माझ्या हातात बॉम्ब नाही, पिस्तूल नाही आणि शस्त्रे नाहीत तरीही पोलिसांनी रोखलं’

Web Title: Coronavirus: The doctor who examined the patients had a corona virus infection mac

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.