CoronaVirus : हवामान विभागातील कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू, १० जण क्वारंटाईन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 02:50 PM2020-04-21T14:50:24+5:302020-04-21T14:51:03+5:30

CoronaVirus : कर्मचाऱ्याचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे समजल्यानंतर हवामान विभागात एकच खळबळ उडाली आहे.

coronavirus delhi weather department employee died in safdarjung hospital rkp | CoronaVirus : हवामान विभागातील कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू, १० जण क्वारंटाईन

CoronaVirus : हवामान विभागातील कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू, १० जण क्वारंटाईन

googlenewsNext

नवी दिल्ली : दिल्लीतील राष्ट्रपती भवनपर्यंत पोहोचलेला कोरोना आता येथील हवामान विभागाच्या कार्यालयात घुसला आहे. नवी दिल्लीतील प्रादेशिक हवामान केंद्रात ड्युटीवर असलेल्या एका कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. 

या कर्मचाऱ्याचा मृत्यू सफदरजंग रुग्णालयात १७ एप्रिलला झाला. या कर्मचाऱ्याचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे समजल्यानंतर हवामान विभागात एकच खळबळ उडाली आहे. विभागातील अनेक कर्माचाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, याठिकाणी सॅनिटायजर केला आहे. याशिवाय, मृत कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या इतर १० कर्मचाऱ्यांना आपल्या घरातच क्वारंटाईन करण्यास सांगितले आहे.

दरम्यान, येथील राष्ट्रपती भवनात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर याठिकाणी काम करणाऱ्या जवळपास १०० लोकांनी स्वत:ला क्वारंटाईन करुन घेतले आहे, अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

दिल्लीत कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज सकाळपर्यंत दिल्लीत कोरोना बाधित रुग्णांचा आकडा २५०० च्या आसपास पोहोचला आहे. दिल्लीत  कंटेनमेंट झोनची संख्याही वाढविण्यात आली आहे. ही संख्या ७९ वरुन ८४ करण्यात आली आहे.

देशामध्ये कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता तब्बल 18 हजारांवर गेला असल्याची माहिती मिळत आहे. आरोग्य विभागाने मंगळवारी दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात कोरोनामुळे ४७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर १ हजार ३३६ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत.

यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १८ हजार ६०१ वर पोहचली आहे. तर ५९० जणांचा मृत्यू झाला आहे. १४ हजार ७५९ जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून ३२५२ लोकांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले आहे.

Web Title: coronavirus delhi weather department employee died in safdarjung hospital rkp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.