coronavirus: केरळात कोरोनाचे सामाजिक निर्बंध वर्षभर लागू राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 04:39 AM2020-07-06T04:39:19+5:302020-07-06T07:18:20+5:30

सार्वजनिक ठिकाणी कुठेही वावरताना, प्रवास करताना तसेच कार्यालयांमध्येही मास्क लावणे तसेच दोन व्यक्तिंमध्ये सहा फुटांचे अंतर ठेवणे जुलै २०२१ पर्यंत बंधनकारक असणार आहे.  

coronavirus: Coronavirus social restrictions in Kerala will remain in force throughout the year | coronavirus: केरळात कोरोनाचे सामाजिक निर्बंध वर्षभर लागू राहणार

coronavirus: केरळात कोरोनाचे सामाजिक निर्बंध वर्षभर लागू राहणार

Next

तिरुवनंतपूरम : कोरोना साथीचा प्रसार रोखण्यासाठी सामाजिक व सार्वजनिक व्यवहार करताना पाळायचे गेल्या मार्चपासून अंमलात आणलेले विविध प्रकारचे निर्बंध पुढील वर्षभर राज्यात सर्वत्र लागू राहतील,  असे केरळ सरकारने रविवारी जाहीर केले. या निर्बंधांचे पालन न करणाऱ्यांना १० हजार रुपयांपर्यंत देड करण्याचीही तरतूद करण्यात आली आहे.
मार्चमध्ये साथ सुरु झाल्यानंतर साथीचे रोग प्रतिबंधक कायद्याखाली काढेलेल्या वटहुकुमात सुधारणा करणारा नवा वटहुकूम यासाठी काढण्यात आला. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी कुठेही वावरताना, प्रवास करताना तसेच कार्यालयांमध्येही मास्क लावणे तसेच दोन व्यक्तिंमध्ये सहा फुटांचे अंतर ठेवणे जुलै २०२१ पर्यंत बंधनकारक असणार आहे.
 
ाास्क न लावणाºयास पहिल्यांना पकडल्यास २०० रुपये व नंतरच्या उल्लंघनासाठी पाच हजार रुपयांपर्यंत दंड करण्यात येईल. राज्यभर सार्वजनिक ठिकाणी थंकण्यासही कडक बंदी असेल.
याखेरीज पुढील वर्षभर सर्व विवाह समारंभ जास्तीत जास्त ५० पाहुण्यांना बोलावून करावे लागतील तर अंत्यविधी व अंत्ययात्रेसाठी फक्त २० माणसे हजर राहू शकतील. गर्दी न करण्याच हा नियम लोकशही मार्गाने आंदोलन करण्याच्या मार्चे, निदर्शने व धरणे अशा कार्यक्रमांनाही लागू असेल. यासाठी पोलिसांची पूर्वपरवानगी तर घ्यावी लागेलच शिवाय यासाठीही जास्तीत जास्त १० माणसांची गर्दी जमविता येईल व त्यांनाही ‘सोशल डिन्टन्सिंग’ पाळावे लागेल.
सर्व सार्वजनिक ठिकाणी हॅण्ड सॅनिटायजर उपलब्ध  करणे बंधनकारक करण्यात आले असून दुकाने, हॉटेल, शॉपिंग मॉल अशा ठिकाणी एका वेळी २५ हून अधिक ग्राहकांनी गर्दी करण्यास बंदी करण्यात आली आहे. बाहेरच्या राज्यातून केरळमध्ये येणाºया प्रत्येक व्यक्तीला राज्य सरकारच्या वेबसाइटवर नोंदणी करून सर्व माहिती द्यावी लागेल.

Web Title: coronavirus: Coronavirus social restrictions in Kerala will remain in force throughout the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.