coronavirus: चिंताजनक! महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये वाढताहेत कोरोनाचे रुग्ण, दुसऱ्या लाटेची भीती

By बाळकृष्ण परब | Published: February 21, 2021 08:20 AM2021-02-21T08:20:57+5:302021-02-21T08:26:07+5:30

Corona patients are rise in Maharashtra : गेल्या काही महिन्यांपासून देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या घटत असताना आता आठवडाभरापासून कोरोनच्या रुग्णसंख्येत अचानक वाढ होऊ लागली आहे.

coronavirus: Corona patients are on the rise in Maharashtra, Kerala & Gujarat fearing a second wave | coronavirus: चिंताजनक! महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये वाढताहेत कोरोनाचे रुग्ण, दुसऱ्या लाटेची भीती

coronavirus: चिंताजनक! महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये वाढताहेत कोरोनाचे रुग्ण, दुसऱ्या लाटेची भीती

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोनाची स्थिती चिंताजनक, गुजरातमध्येही वाढू लागलीय रुग्णसंख्या शनिवारी महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या सहा हजार २८१ रुग्णांची नोंद, केरळमध्ये चार हजार ६५० रुग्णांची नोंदकोरोनाचा फैलाव पुन्हा वाढू लागल्याने व्यक्त करण्यात येत आहे कोरोनाची दुरसी लाट आल्याची भीती

नवी दिल्ली - गेल्या काही महिन्यांपासून देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या घटत असताना आता आठवडाभरापासून कोरोनच्या रुग्णसंख्येत अचानक वाढ होऊ लागली आहे. (Covid-19) त्यामुळे विविध राज्यांसह केंद्र सरकारची चिंता वाढली आहे. (fearing a Covid-19 second wave) त्यातही महाराष्ट्रासह, केरळ, गुजरात आणि अन्य काही राज्यात कोरोनाचा फैलाव पुन्हा वाढू लागल्याने कोरोनाची दुरसी लाट आल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. (Corona patients are rise in Maharashtra, Kerala & Gujarat)

समोर येत असलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोनाची स्थिती चिंताजनक आहे. तर गुजरातमध्येही रुग्णसंख्या वाढू लागली आहे. शनिवारी महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या सहा हजार २८१ रुग्णांची नोंद झाली. तर केरळमध्ये चार हजार ६५० रुग्णांची नोंद झाली. गुजरातमध्ये शनिवारी कोरोनाचे २५८ नवे रुग्ण सापडले. महाराष्ट्रातील सलग दुसऱ्या दिवशी सहा हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली.

आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, शनिवारी सापडलेल्या ६ हजार २८१ रुग्णांपैकी १७०० रुग्णांपेक्षा अधिक किंवा २७ टक्के रुग्ण हे मुंबई आणि अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील आहेत. राज्यातील आतापर्यंतच्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या २० लाख, ९३ हजार ९१३ एवढी झाली आहे. तर ४० जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या वाढून ५१ हजार ७५३ झाली आहे. राज्यात सध्या कोरोनाचे ४८ हजार ४३९ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.


दुसरीकडे केरळमध्ये शनिवारी कोरोनाच्या चार हजार ६५० नव्या रुग्णांची नोंद झाली. तर १३ जणांचा मृत्यू झाला. त्यासह राज्यातील एकूण बाधितांची संख्या १० लाख ३० हजारांवर पोहोचली आहे. राज्यात आतापर्यंत ९ लाख ६७ हजार ६३० जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर ५८ हजार ६०६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

गुजरातमध्येही कोरोनाच्या २५८ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या वाढून २ लाख ६६ हजार ८२१ झाली आहे. गुजरातमध्ये शनिवारी कुणाचाही मृत्यू झालेला नाही. त्यामुळे मृतांची संख्या ४ हजार ४०४ वर स्थिर आहे. तर राज्यात सध्या १ हजार १६७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

 

 

Web Title: coronavirus: Corona patients are on the rise in Maharashtra, Kerala & Gujarat fearing a second wave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.