Coronavirus: टायफॉइड समजून कोरोनावरील उपचारांना उशीर, येथे महिनाभरात दुपटीने वाढला मृतांचा आकडा 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 03:21 PM2021-05-10T15:21:05+5:302021-05-10T15:22:16+5:30

Coronavirus in India: अनेक शहरांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे परिस्थिती बिकट झालेली आहे. मात्र असे असले तरी काही ठिकाणी कोरोनाकडे होणारे दुर्लक्ष जीवघेणे ठरत आहे.

Coronavirus: Corona or typhoid, Delayed treatmen, death toll doubles in a month in Bokaro | Coronavirus: टायफॉइड समजून कोरोनावरील उपचारांना उशीर, येथे महिनाभरात दुपटीने वाढला मृतांचा आकडा 

Coronavirus: टायफॉइड समजून कोरोनावरील उपचारांना उशीर, येथे महिनाभरात दुपटीने वाढला मृतांचा आकडा 

Next

बोकारो - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सध्या देशभरात थैमान घातले आहे. अनेक शहरांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे परिस्थिती बिकट झालेली आहे. मात्र असे असले तरी काही ठिकाणी कोरोनाकडे होणारे दुर्लक्ष जीवघेणे ठरत आहे. (Coronavirus in India) झारखंडमधील बोकारो या शहरामध्येही अशीच परिस्थिती निर्माण झाली असून, येथे महिनाभरात मृतांची संख्या दुपटीने वाढली आहे. तसेच सक्रिय रुग्णांच्या बाबतीत हे शहर राज्यात चौथ्या क्रमांकावर आले आहे. (death toll doubles in a month in Bokaro)

बोकारो शहरातील रहिवासी त्यांना कोरोना झालाय की टायफॉइड यावरून गोंधळून जात आहे. त्यामुळे योग्य उपचारांना उशीर होत असून, उशिरा सुरू होणाऱ्या किंवा चुकीच्या उपचारांमुळे येथील मृतांची संख्या झपाट्याने वाढत आहे. येथील ग्रामीण भागातील लोक कोरोना चाचणी करण्यास घाबरत असल्याची माहितीही डॉक्टरांनी दिली. 

इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार बोकारोमधीली सदर रुग्णालयामध्ये सुमारे ३६ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जवळच्याच गावात राहणाऱ्या ५५ वर्षीय धर्मनाथ यांच्यावरही याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या मुलाचे म्हणणे आहे की, सुरुवातीला डॉक्टरांनी त्यांच्यावर टायफॉइड समजून उपचार केले. त्यानंतरही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. ती पॉझिटिव्ह आली. 

मात्र प्रत्येक रुग्णाचे नशीब चांगले असेलच असे नाही. ४० किमी दूर पटेरवार ब्लॉक येथील राहणाऱ्या रामस्वरूप अग्रवाल यांना गेल्या महिन्यात टायफॉइड झाला होता. त्यांना जवळच्याच रामगडमधील एखा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र २८ एप्रिल रोजी त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. येथील सरपंच अनिल सिंह यांनी सांगितले की, टायफॉइडबाबत गावातील लोकांचा खूप गोंधळ उडत आहे. सुरुवातीच्या तपासणीमध्ये अग्रवाल यांना कोरोना असल्याचे दिसून आले. मात्र त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. 

दरम्यान, येथील एका सरकारी रुग्णालयातील मेडिकल सुपरिटेंडेंट अलबेला केरकेट्टा यांनी सांगितले की, लोक कोरोनावर उपचार घेण्यास घाबरत आहेत. कुणाचा टायफॉइडचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर ते सुटकेचा निश्वास टाकत आहेत. मात्र नंतर अशा रुग्णांची प्रकृती बिघडत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात लोकांमध्ये जागरुकता वाढण्याची गरज आहे. 

Web Title: Coronavirus: Corona or typhoid, Delayed treatmen, death toll doubles in a month in Bokaro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.