CoronaVirus: “जनतेने ठरवलं तर देशातील कोरोना २१ दिवसांत जाऊ शकतो”; खासदाराचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 01:48 PM2021-05-16T13:48:24+5:302021-05-16T13:50:36+5:30

CoronaVirus: जनतेने ठरवले तर २१ दिवसांत कोरोना जाऊ शकतो, असा दावा बिहारमधील एका खासदाराने केला आहे.

CoronaVirus: "Corona in the country can go in 21 days if people decide"; MP's claim | CoronaVirus: “जनतेने ठरवलं तर देशातील कोरोना २१ दिवसांत जाऊ शकतो”; खासदाराचा दावा 

CoronaVirus: “जनतेने ठरवलं तर देशातील कोरोना २१ दिवसांत जाऊ शकतो”; खासदाराचा दावा 

googlenewsNext
ठळक मुद्देजनतेने ठरवलं तर देशातील कोरोना २१ दिवसांत जाऊ शकतोबिहारमधील खासदाराचा दावा

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. कोरोनाबाधित आणि कोरोनामुळे होणारे मृत्यू दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहेत. कोरोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे कोरोना लस, ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स यांचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर जनतेने ठरवले तर २१ दिवसांत कोरोना जाऊ शकतो, असा दावा बिहारमधील एका खासदाराने केला आहे. (mp ajay mandal claims that if public wishes then corona can go in 21 days)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा परिणाम देशावर होतााना पाहायला मिळत आहे. देशाला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा तज्ज्ञांकडून दिला जात आहे. मात्र, अशातच बिहारमधील खासदार अजय मंडल यांच्या निधनाची अफवा पसरली. यावर स्पष्टीकरण देण्यासाठी अजय मंडल यांनी तातडीने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी अजय मंडल यांनी सदर दावा केला आहे. 

लस हाच उपाय, भारतात ‘इतक्या’ कोटी नागरिकांचे लसीकरण आवश्यक; तज्ज्ञांचे मत

२१ दिवसांत कोरोना जाऊ शकतो

पत्रकारांशी बोलताना मंडल यांनी मोठा दावा केला. जनतेने ठरवले, तर केवळ २१ दिवसांत कोरोनाचे समूळ उच्चाटन देशातून होऊ शकते. कोरोना चेन आपण तोडू शकतो. गर्दी केली नाही, तर कोरोनाही राहणार नाही, असा दावा करत प्रत्येक रुग्णाला शोधून त्याला मदत करणे शक्य नाही, असेही मंडल यांनी स्पष्ट केले. कोरोना काळात आम्हीही मदत केली. मात्र, त्याचा गवगवा सोशल मीडियावर केले नाही, असे मंडल यांनी यावेळी बोलताना सांगितले.

लसीकरणासाठी ७० हजार कोटींहून कमी खर्च

भारत देश खूप मोठा आहे. भारताची लोकसंख्याही खूप अधिक आहे. असे असूनही आपल्याकडे संसाधने पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. एका दिवसाच्या लॉकडाऊनमुळे १० हजार कोटींचे नुकसान सोसावे लागते. देशातील ५१ कोटी नागरिकांचे प्राधान्याने लसीकरण करणे आवश्यक आहे. आतापर्यंत किमान एक डोस दिलेल्या नागरिकांची संख्या १३ कोटींच्या घरात आहे. या सर्वांचे लसीकरण करण्यासाठी ७० हजार कोटीहून कमी खर्च होऊ शकेल, असेही डॉ. शेट्टी यांनी सांगितले. 

राजीव सातव सक्षम, प्रतिभावान नेतृत्व होतं, संसदेतील चांगला मित्र गमावला: पंतप्रधान मोदी

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून गेल्या २४ तासांतील आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. भारतात शनिवारी दिवसभरात ३ लाख ११ हजार १७० नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ३ लाख ६२ हजार ४३७ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. सध्या देशात ३६ लाख १८ हजार ४८५ रुग्ण उपचार घेत आहेत. तर दिवसभरात ४,०३७ रुग्णांना करोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत.
 

Web Title: CoronaVirus: "Corona in the country can go in 21 days if people decide"; MP's claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.