Coronavirus : एअर इंडियाच्या विमानात आता हजमत सूट सर्व पायलटस् आणि क्रू मेंबर यांना देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 12:12 AM2020-03-22T00:12:44+5:302020-03-22T06:59:50+5:30

Coronavirus: दीर्घ पल्ल्याच्या उड्डाणाच्या बोइंग ७७७ विमानात एकूण ४० सूट राहतील.

Coronavirus: Air India flight will now give Hazmat discount to all pilots and crew members | Coronavirus : एअर इंडियाच्या विमानात आता हजमत सूट सर्व पायलटस् आणि क्रू मेंबर यांना देणार

Coronavirus : एअर इंडियाच्या विमानात आता हजमत सूट सर्व पायलटस् आणि क्रू मेंबर यांना देणार

Next

कोरोनाच्या धास्तीमुळे एअर इंडियाने आपल्या सर्व पायलटस् आणि फ्लाइट अटेंडंटस् यांना हजमत सूट (संसर्गापासून संरक्षण करणारा ड्रेस) दिला आहे. हे पाऊल उचलणारी एअर इंडिया ही पहिली विमान कंपनी आहे. या सूटमध्ये ग्लोज, मास्क, शू-कवर, चश्मा आदी संरक्षण आहे. हा सूट कॉकपिटमध्ये असेल आणि संशयित असल्यास याचा वापर केला जाईल.

कोणताही प्रवासी अथवा क्रू मेंबर आजारी पडला अथवा त्याला ताप, सर्दी, श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला तर याचा वापर केला जाईल. विमानात दोन अतिरिक्त सूटही असतील. संशयितासाठी एक आणि देखरेख करणारासाठी एक सूट असेल.

दीर्घ पल्ल्याच्या उड्डाणाच्या बोइंग ७७७ विमानात एकूण ४० सूट राहतील. यात ८ पायलटसाठी, २ पॅसेंजर्ससाठी आणि उर्वरित सर्व प्रत्येक क्रू मेंबरसाठी असतील. देशांतर्गत विमान उड्डाणात ए ३२० मध्ये १६ हजमत सूट असतील. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, मोठ्या संख्येने हजमत सूटची ऑर्डर केली आहे.

Web Title: Coronavirus: Air India flight will now give Hazmat discount to all pilots and crew members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.