Coronavirus: दिल्ली संमेलनातून २४ जणांना संसर्ग; ५१४ जण देखरेखीखाली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 02:20 AM2020-04-02T02:20:56+5:302020-04-02T06:24:55+5:30

२३६१ लोकांना निजामुद्दीनमधून काढले

Coronavirus: 24 persons infected with Delhi meeting; 514 person under supervision | Coronavirus: दिल्ली संमेलनातून २४ जणांना संसर्ग; ५१४ जण देखरेखीखाली

Coronavirus: दिल्ली संमेलनातून २४ जणांना संसर्ग; ५१४ जण देखरेखीखाली

Next

नवी दिल्ली : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निझामुद्दीन मरकजने साऱ्या देशाचे लक्ष वेधले आहे. गेल्या पाच दिवसांमध्ये तब्बल २ हजार ३६१ लोकांना येथून बाहेर काढले आहे. बुधवारी पहाटे साडेतीनपर्यंत ही मोहीम सुरू होती. मरकजमधून विविध रुग्णालयांमध्ये दाखल ५३६ पैकी २४ पॉझिटिव्ह आले आहेत. इतरांचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत. इतर १८१० जणांमध्ये लक्षणे नसली तरीही आयसोलेशनमध्ये ठेवले आहे.

देश-विदेशातील मुस्लीम बांधव एका धार्मिक कार्यक्रमासाठी निझामुद्दीनमध्ये एकत्र आले होते. १२ ते १५ मार्च या कालावधीत झालेल्या कार्यक्रमासाठी आलेल्या लोकांपैकी काही जण आपापल्या राज्यांमध्ये, देशांमध्ये परतले मात्र, लॉकडाउननंतरही शेकडो लोक इथेच होते, ही बाब अगदी अलीकडेच पुढे आली.

पोलिसांनी आतापर्यंत २ हजार ३६१ लोकांना बाहेर काढले असून त्यातील ६१७ लोकांना दिल्लीतील विविध रुग्णालयांमध्ये भरती केले आहे. यातील २४ लोकांचा रिपोर्ट मंगळवारी पॉझिटिव्ह आला होता, अशी माहिती उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आज (बुधवार) दिली. पाच दिवसांपैकी गेल्या ३६ तासांत झालेल्या आॅपरेशनने सर्वांचे लक्ष वेधले. कारण यातूनच शेकडो लोक इतर राज्यांमध्ये गेल्याने तेथेही कोरोनाच्या संक्रमणाचा धोका निर्माण झाला.

लॉकडाउननंतर विविध देशांचे भारतातील दूतावास आपल्या नागरिकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागले. यात पहाडगंजमधील हॉटेल्समध्ये मुक्कामाला असलेल्यांचाही समावेश होता. काही लोक मरकजनंतर पहाडगंज येथील हॉटेलमध्ये मुक्कामाला असावेत, असाही अंदाज आहे. सध्या पहाडगंजमधील दोनशेहून अधिक हॉटेल्समध्ये जवळपास ५०० विदेशी नागरिक थांबले आहेत. त्यांच्यासाठी पहाडगंज‘होम स्टे’प्रमाणे ठरत आहे.

राज्यातील ६४२ भाविक

मुंबई ५०। ठाणे १६१। पुणे १३६। सातारा ५ सांगली ३ । सोलापूर १७। कोल्हापूर २१ नागपूर ७०। यवतमाळ १२। चंद्रपूर २
गोंदिया १९। वर्धा ८ । भंडारा २। अकोला १०। औरंगाबाद १४। परभणी ३ नांदेड ११। उस्मानाबाद ७। हिंगोली १२ नाशिक ३२। अहमदनगर ३४। जळगाव १३

मौलाना सादचा शोध

च्दिल्ली पोलिसांनी २८ मार्चला नोटीस बजावल्यापासून निझामुद्दीन मरकजचे मौलाना साद बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.
च्मौलाना साद यांच्यासह डॉ. झीशन, मुफ्ती शहजाद, एम. सैफी, युनूस आणि मोहम्मद सलमान यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आले आहे.

Web Title: Coronavirus: 24 persons infected with Delhi meeting; 514 person under supervision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.