coronavirus: केवळ ५ दिवसांत देशात कोरोनाचे लाखभर नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 06:46 AM2020-07-08T06:46:32+5:302020-07-08T06:46:43+5:30

मंगळवारी आणखी ४६७ मृत्यू झाल्याने एकूण बळींचा आकडा २० हजार १६० इतका झाला.

coronavirus: 1 lakh of new coronavirus patients in the country in just 5 days | coronavirus: केवळ ५ दिवसांत देशात कोरोनाचे लाखभर नवे रुग्ण

coronavirus: केवळ ५ दिवसांत देशात कोरोनाचे लाखभर नवे रुग्ण

Next

नवी दिल्ली : कोरोनाबाधितांची संख्या मागील पाच दिवसांत लाखभराने वाढल्याने देशाने सात लाख रुग्णांचा टप्पा पार केला. मंगळवारी एका दिवसात नवे २२ हजार २५२ रुग्ण आढळले. बाधितांची संख्या एक लाख होण्यासाठी ११० दिवसांचा कालावधी लागला तर त्यानंतर केवळ
४९ दिवसांत आणखी सहा रुग्णांची भर पडली.
मंगळवारी आणखी ४६७ मृत्यू झाल्याने एकूण बळींचा आकडा २० हजार १६० इतका झाला. देशात सध्या ७ लाख १९ हजार ६६५ कोरोनाबाधित आहेत तर आजवर ४ लाख ३९ हजार ९४७ यातून बरे झाले. देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६१.१३ टक्के आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने दिलेल्या माहितीनुसार देशात आजपर्यंत एकूण १ कोटी २ लाख ११ हजार ९२ इतक्या नमुन्यांची कोरोना चाचणी केली आली आहे.

Web Title: coronavirus: 1 lakh of new coronavirus patients in the country in just 5 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.