सरकारची मोठी घोषणा, १६ जानेवारीपासून देशभरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरूवात

By जयदीप दाभोळकर | Published: January 9, 2021 04:58 PM2021-01-09T16:58:20+5:302021-01-09T17:01:42+5:30

काही दिवसांपूर्वी सीरम इन्स्टीट्यूट आणि भारत बायोटेकच्या लसींच्या आपात्कालिन वापरास सरकारनं दिली होती परवानगी

corona virus Vaccination drive to kick off on 16th January 2021 pm narendra modi india | सरकारची मोठी घोषणा, १६ जानेवारीपासून देशभरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरूवात

सरकारची मोठी घोषणा, १६ जानेवारीपासून देशभरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरूवात

googlenewsNext
ठळक मुद्देसरकारनं ठरवला प्राधान्यक्रमपंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली उच्चस्तरीय बैठक

देशात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी धोका मात्र अद्यापही टळलेला नाही. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारनं सीरम इन्स्टीट्यूट आणि भारत बायोटेकच्या करोना प्रतिबंधात्मक लसींच्या आपात्कालिन वापरासाठी परवानगी दिली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली देशातील कोरोनाची स्थिती आणि लसीकरणासंबंधी तयारींची माहिती घेण्यासाठी एका उच्चस्तरीय बैठकीचं आयोज करण्यात आलं होतं. यासोबत केंद्र सरकारनं देशभरात लसीकरणआच्या तारखेचीही घोषणा केली. देशभरात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरूवात केली जाणार आहे.

कोरोना प्रतिबंधात्मक लस सुरूवातीला कोणाला दिली जाणार याचा प्राधान्यक्रम सरकारनं तयार केला आहे. सुरूवातील ३ कोटी आरोग्य कर्मचारी आणि फ्रन्टलाईन वर्कर्सना ही लस दिली जाणार आहे. त्यानंतर ५० वर्षांवरील व्यक्तींना आणि त्या पश्चात त्यांच्यापेक्षा कमी वयाच्या नागरिकांना ज्यांना कोणता गंभीर आजार आहे त्यांना ही लस दिली जाईल. देशात अशा लोकांची संख्या ही २७ कोटींच्या जवळपास आहे.



 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील लसीकरणाच्या कार्यक्रमाची तयारी आणि कोरोनाची स्थिती जाणून घेण्यासाठी उच्च स्तरीय बैठक घेतली. या बैठकीत कॅबिनेट सेक्रेटरी, पंतप्रधानांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी, हेल्थ सेक्रेटरी आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता. यापूर्वीच सरकारं भारतातील दोन लसींच्या आपात्कालिन वापरास परवानगी दिली आहे.

बैठकीत पंतप्रधानांनी देशभरातील कोरोना लसीकरणाच्या तयारीचा आढावा घेतला. तसंच यादरम्यान त्यांनी Co-WIN वॅक्सिन डिलिव्हरी मॅनेजमेंट सिस्टमच्या बाबतही माहिती घेतली. हा एक असा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे ज्याद्वारे कोरोा लसीकरणावर रिअल टाईम लक्ष ठेवणं, लसीच्या साठ्याबाबातच्या सूचना, ते साठवण्यासाठी लागणारं तापमा आणि ज्यांना लस द्यायची आहे त्यांना ट्रॅक करण्याचं काम होणार आहे. आतापर्यंत ७९ लाखांपेक्षा अधिक लोकांनी यावर रजिस्टर केलं आहे.

Web Title: corona virus Vaccination drive to kick off on 16th January 2021 pm narendra modi india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.