Corona Virus: महासत्ताही हतबल; अमेरिकेत होऊ शकतात एक लाखहून अधिक मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 12:40 PM2020-03-30T12:40:12+5:302020-03-30T12:41:19+5:30

पुढील दोन आठवड्यात कोरोनाचा कहर उच्च पातळी गाठण्यासाठी शक्यता आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगची मर्यादा ३० एप्रिलपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी १ जूनपर्यंत सर्वकाही पूर्वपदावर येईल, अशी आशा ट्रम्प यांनी व्यक्त केली होती.

Corona Virus: superpower desperate; More than one lakhs deaths can occur in the United States | Corona Virus: महासत्ताही हतबल; अमेरिकेत होऊ शकतात एक लाखहून अधिक मृत्यू

Corona Virus: महासत्ताही हतबल; अमेरिकेत होऊ शकतात एक लाखहून अधिक मृत्यू

Next

नवी दिल्ली - अमेरिकेत कोरोना व्हायरसचा प्रसार झपाट्याने होत आहे. आतापर्यंत अमेरिकेत सव्वालाख लोक कोरोना व्हायरसने बाधित झाले आहेत. या व्हायरसमुळे येथे २५०० लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प सरकार कोरोना व्हायरसवर प्रतिबंध घालण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. मात्र आता कोरोनामुळे अमेरिकेत एक लाखहून अधिक मृत्यू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

राष्ट्रपती ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच व्हाईट हाऊसमध्ये माध्यमांशी बोलताना म्हटले होते की, पुढील दोन आठवड्यात अमेरिकेत कोरोना व्हायरसमुळे मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणून ट्रम्प यांनी सोशल डिस्टन्सिंगचा नियम लागू केला होता. त्याची मुदत ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे.

पुढील दोन आठवड्यात कोरोनाचा कहर उच्च पातळी गाठण्यासाठी शक्यता आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगची मर्यादा ३० एप्रिलपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी १ जूनपर्यंत सर्वकाही पूर्वपदावर येईल, अशी आशा ट्रम्प यांनी व्यक्त केली होती.

ट्रम्प सरकारमधील साथीच्या रोगाच्या तज्ज्ञांनी अमेरिकेत कोरोनामुळे एक ते दोन लाख लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. अमेरिकेचे नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ एलर्जी अँड व्हायरल इन्फेक्शन डिसीजचे निर्देशक एंथनी फॉकी यांनी एका मुलाखतीत म्हटले की, अमेरिकेत कोरोना बाधितांचा आकडा १० लाखांवर जावू शकतो. यापैकी एक लाखहून अधिक लोकांचा मृत्यू होईल अशा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.  

 

Web Title: Corona Virus: superpower desperate; More than one lakhs deaths can occur in the United States

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.