Corona Virus : धोका वाढला! ओमायक्रॉनच्या दहशतीतच कर्नाटक-तेलंगणात फुटला कोरोना बॉम्ब, 112 विद्यार्थी पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 04:34 PM2021-12-06T16:34:36+5:302021-12-06T16:35:46+5:30

कर्नाटकातील चिकमंगळूरमध्ये एका सरकारी निवासी शाळेतील 59 विद्यार्थी तसेच 10 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण.

Corona Virus omicron fear increase by corona virus outbreak in karnataka school and telangana medical college | Corona Virus : धोका वाढला! ओमायक्रॉनच्या दहशतीतच कर्नाटक-तेलंगणात फुटला कोरोना बॉम्ब, 112 विद्यार्थी पॉझिटिव्ह

Corona Virus : धोका वाढला! ओमायक्रॉनच्या दहशतीतच कर्नाटक-तेलंगणात फुटला कोरोना बॉम्ब, 112 विद्यार्थी पॉझिटिव्ह

Next

ओमायक्रॉन व्हेरिअंटचा धोका वाढत असतानाच कर्नाटकातील सरकारी शाळा आणि तेलंगणातील वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना बॉम्ब फुटला आहे. कर्नाटकातील चिकमंगळूरमध्ये एका सरकारी निवासी शाळेतील 59 विद्यार्थी तसेच 10 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. याच बरोबर तेलंगणातील करीमनगर येथील चालमेडा आनंद राव वैद्यकीय विज्ञान संस्थेत 43 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

कर्नाटकातील चिकमंगळुरू येथील सर्वोच्च जिल्हा अधिकाऱ्यांनी सांगितले, की कोणत्याही संक्रमित विषाणूची लक्षणे आढळली नाहीत. चिकमंगळुरूचे उपायुक्त केएन रमेश म्हणाले, घाबरण्याची गरज नाही, कारण वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत आणि एक रुग्णवाहिकाही स्टँडबाय ठेवण्यात आली आहे. दरम्यान, 450 निवासी विद्यार्थ्यांची नोंद असलेली शाळा सील करण्यात आली असून सॅनिटाइझही करण्यात आली आहे. तसेच, संक्रमित विद्यार्थी आणि कर्मचारी यांना वसतिगृहाच्या एका भागात क्वारंटाइन करण्यात आले आहे.

तसेच, तेलंगणातील बोमक्कल गावातील मेडिकल कॉलेजमध्ये 43 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त असून अद्याप सविस्तर माहितीची प्रतीक्षा आहे. डिस्ट्रिक्ट मेडिकल हेल्थ ऑफिसरने रविवार सांगितले की, अद्याप कॉलेजकडून इतर माहिती देणे बाकी आहे. तेलंगणात सोमवारपर्यंत कोरोनाचे एकूण 3 हजार 787 सक्रिय रुग्ण होते. तसेच राज्यात आतापर्यंत एकूण ३ हजार ९९९ रुग्णांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

Web Title: Corona Virus omicron fear increase by corona virus outbreak in karnataka school and telangana medical college

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app