Corona virus : कोरोनामुळे रोजगार गेलेल्यांना सरकारतर्फे अर्थसाह्य मिळणार? यूबीआय योजनेचा विचार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 06:04 AM2020-03-20T06:04:29+5:302020-03-20T06:04:46+5:30

कोरोनाचा सर्वाधिक विपरित परिणाम झालेल्या हॉटेल्स, पर्यटन, टूर अँड ट्रॅव्हल अशा क्षेत्रांत काम करणाऱ्यांना तसेच स्वयंरोजगारावर अवलंबून असाणा-यांना ठराविक रक्कम देण्याची ही योजना असू शकेल, असे संबंधित सरकारी अधिका-याने सांगितले आहे.

Corona virus: government funding to who lost job Due to Corona? The idea of a UBI plan | Corona virus : कोरोनामुळे रोजगार गेलेल्यांना सरकारतर्फे अर्थसाह्य मिळणार? यूबीआय योजनेचा विचार

Corona virus : कोरोनामुळे रोजगार गेलेल्यांना सरकारतर्फे अर्थसाह्य मिळणार? यूबीआय योजनेचा विचार

Next

नवी दिल्ली : कोरोनामुळे अनेकांना घरीच राहावं लागत आहे. अनेकांना नोकरी जाण्याची भीती आहे. कोरोनाचा रोजगारावर परिणाम होणाऱ्यांना युनिवर्सल बेसिक इन्कमद्वारे (यूबीआय) मदत करण्याचा सरकार विचार करीत आहे, असे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. पंतप्रधान शेतकरी योजनेच्या पद्धतीने कोणत्याही अटीविना आर्थिक मदत संबंधितांना केली जाईल.

कोरोनाचा सर्वाधिक विपरित परिणाम झालेल्या हॉटेल्स, पर्यटन, टूर अँड ट्रॅव्हल अशा क्षेत्रांत काम करणाऱ्यांना तसेच स्वयंरोजगारावर अवलंबून असाणा-यांना ठराविक रक्कम देण्याची ही योजना असू शकेल, असे संबंधित सरकारी अधिका-याने सांगितले आहे. असंघटित क्षेत्रात काम करणाºयांना, पण कोरोनाच्या निर्बंधांमुळे रोजगार करणाºयांनाही या योजनेचा फायदा मिळू शकेल. तसेच आर्थिक मंदीतून बाहेर पडणे शक्य होईल.

ही रक्कम देण्यासाठी कोणत्याही प्रकारची अट सरकार घालणार नाही. रोजगार गेल्याने हातात पैसा नसल्यामुळे संबंधितांना जगता यावे, यासाठी ही रक्कम असेल, असे वृत्तात म्हटले आहे. अमेरिका व हाँगकाँगसह काही देशांनी अशी रक्कम देण्याची घोषणा केली आहे.

उत्तर प्रदेशची घोषणा
युनिवर्सल बेसिक इनकम योजनेद्वारे सरकार काही लाख लोकांना अशी मदत करू शकेल. ज्यांना कामावर जाण्याची आणि घरी बसण्याचीच सक्ती करण्यात आली आहे, त्यांना यामुळे मोठा दिलासा मिळू शकेल. उत्तर प्रदेश सरकारने असंघटित क्षेत्रातील आणि ज्यांचे पोट रोजंदारीवर आहे, अशांना ठराविक रक्कम देण्याची घोषणा केली आहे.

Web Title: Corona virus: government funding to who lost job Due to Corona? The idea of a UBI plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.