Corona Vaccine: ​​​​​​ अॉगस्ट ते डिसेंबरपर्यंत भारतात दोन अब्ज डोसची निर्मिती होणार? तज्ज्ञ म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 03:49 PM2021-05-17T15:49:34+5:302021-05-17T15:49:50+5:30

Corona Vaccination in India: अॉगस्ट ते सप्टेंबर या काळात देशामध्ये कोरोनाविरोधातील  दोन अब्ज लसी उपलब्ध केल्या जातील. ज्या देशातील संपूर्ण लोकसंख्येचे लसीकरण करण्यासाठी पुरेशा असतील, असा दावा सरकारकडून करण्यात येत आहे.  मात्र याबाबत तज्ज्ञ मात्र वेगळेच मत मांडत आहेत.

Corona Vaccine: Two billion doses to be produced in India from August to December? Experts express concern | Corona Vaccine: ​​​​​​ अॉगस्ट ते डिसेंबरपर्यंत भारतात दोन अब्ज डोसची निर्मिती होणार? तज्ज्ञ म्हणतात...

Corona Vaccine: ​​​​​​ अॉगस्ट ते डिसेंबरपर्यंत भारतात दोन अब्ज डोसची निर्मिती होणार? तज्ज्ञ म्हणतात...

Next

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे सध्या भारतात गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. या बिकट परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कोरोनावरील लस आणि लसीकरणाबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.  (Corona Vaccination in India) अॉगस्ट ते सप्टेंबर या काळात देशामध्ये कोरोनाविरोधातील  दोन अब्ज लसी उपलब्ध केल्या जातील. ज्या देशातील संपूर्ण लोकसंख्येचे लसीकरण करण्यासाठी पुरेशा असतील, असा दावा सरकारकडून करण्यात येत आहे.  मात्र याबाबत तज्ज्ञ मात्र वेगळेच मत मांडत आहेत. अॉगस्ट ते डिसेंबर या काळात देशात दोन अब्ज लसी उपलब्ध होतील का याबाबत शंका आहे, असे देशातील प्रख्यात व्हायरोलॉजिस्ट  डॉ. गगनदीप कांग यांनी सांगितले. (Two billion doses to be produced in India from August to December? Experts express concern )

सिरम इंन्स्टिट्युट आणि भारत बायोटेक यासारख्या लसनिर्मात्या कंपन्याची उत्पादन क्षमता अद्याप वाढलेली नाही. अशा परिस्थितीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर लसींची निर्मिती होण्यासाठी आद्याप वेळ लागू शकतो, असेही त्यांनी सांगितले.

मनीकंट्रोलला दिलेल्या मुलाखतीमध्ये गगनदीप कांग यांनी लसींबाबतच्या केंद्र सरकारच्या योजनेवर शंका जाहीर केली आहे. त्या म्हणाल्या की, आतापर्यंत भारत बायोटेकची नेझल लस आणि झायडस कँडिलाच्या डीएनएस लसीच्या उपयुक्ततेबाबत पुरेसे आकडे उपलब्ध झालेले नाहीत. तुम्हाला आठवत असेल तर गतवर्षी  डिसेंबरपर्यंत सिरम इंन्स्टिट्युट दहा कोटी आणि भारत बायोटेक एक कोटी लसींची निर्मिती करेल असे सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात असे घडले नाही. 

गगनदीप कांग ह्या लस संशोधन आणि वापरा बाबतच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या सल्लागार समितीच्या सदस्यसुद्धा आहेत. दरम्यान, डॉ. कांग यांनी सरकारी यादीत समावेश असलेल्या अन्य लसींबाबतही शंका उपस्थित केली आहे. तसेच या लसींबाबत आतापर्यंत त्यांच्याकडे डेटा उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान भारत बायोटेकच्या कोव्हँक्सिन लसीच्या चाचणीदरम्यान या लसीबाबत शंका उपस्थित केली होती. मात्र नंतर कोविशिल्ड आणि कोव्हँक्सिन प्रभावी असल्याचे सांगितले होते.

Web Title: Corona Vaccine: Two billion doses to be produced in India from August to December? Experts express concern

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.